जिल्ह्यातील दोन हजार हून अधिक भाविक घेणार तीर्थ दर्शन योजनेचा लाभ

जिल्ह्यातील दोन हजार हून अधिक भाविक घेणार

तीर्थ दर्शन योजनेचा लाभ

भंडारा दि.26 : देशातील मोठ्या तीर्थयात्रांना जाऊन मनशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुखकर व्हावेयासाठी राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरिकांना देशातील व राज्यातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने”च्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाने उपलब्ध करून दिलेली आहे. भंडारा जिल्ह्यातून 2088 भाविक तिर्थदर्शनाचा लाभ घेणार आहेत.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने राज्यासह देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” राबवण्याचे घोषित केले होतेत्यानुसार या योजनेचा शासन निर्णय देखील सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्ध केला आहे. भारतातील एकूण 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत चारधामपासून वैष्णवी देवीपर्यंत यात्रा ज्येष्ठ नागरीकांना घडविल्या जाणार आहेत. आपापल्या धर्मानुसार तीर्थस्थळांची निवड लाभार्थ्यांना करता येईल. त्यासाठीच जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरीकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. सचिन मडावी सहाय्यक आयुक्त भंडारा यांनी केले.

या योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थक्षेत्रापैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहेतसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती 30 हजार रुपये इतकी राहणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजननिवास इत्यादी बाबींचा समावेश आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता लाभार्थीचे वय 60 वर्षापेक्षा अधिकविहित अर्जत्यात आधार कार्डमोवाईल क्रमांक गरजेचेलाभार्थ्याचे वैद्यकिय प्रमाणपत्रजवळच्या नातेवाईकाचे प्रमाणपत्रसक्षम अधिकाऱ्याचे 2 लाख 50 हजार पर्यंतचे वार्षिक उत्पन्न दाखला असावे व लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा इ. अटी व निकष शासन निर्णयामध्ये नमूद केलेले आहेत. 75 वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल.

अर्ज करण्यास अडचण येवू नये म्हणून ऑफलाईन अर्जाची सोय करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी ग्राम स्तरावरील तसेच तालुका स्तरावरील शासकीय यंत्रणासबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण कार्यालयेशासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा कार्यालयात संपर्क साधावा सदर कार्यालयात अर्ज भरुन सादर करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.