किशोरवयीन जीवन कौशल्य शिक्षण कार्यक्रम ( AEP ) अंतर्गत एच.आय.व्ही / एड्स आणि लैंगिक आजारविषयी शालेयशिक्षक व शिक्षिका यांचे प्रशिक्षण संपन्न

किशोरवयीन जीवन कौशल्य शिक्षण कार्यक्रम ( AEP ) अंतर्गत एच.आय.व्ही / एड्स आणि लैंगिक आजारविषयी शालेयशिक्षक व शिक्षिका यांचे प्रशिक्षण संपन्न

गडचिरोली,दि.24: जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांचे वतीने जिल्हा शल्य चिकित्सकडॉ. माधुरी किलनाके यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २३/०९/२०२४ रोजी ८ वी, ९ वी व ११ वी इयत्तेस विज्ञान विषयशिकवणाऱ्या शालेय शिक्षक व शिक्षिका यांचे किशोरवयीन जीवन कौशल्य शिक्षण कार्यक्रम ( AEP ) अंतर्गतएच.आय.व्ही / एड्स आणि लैंगिक आजारविषयी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.प्रमुख उद्देश म्हणजे शाळेतील मुलांचे भविष्य घडविण्यात शिक्षकांचा सिहांचा वाटा असतो, म्हणूनकिशोरवयीन ( १० ते १९ वयोगट ) विद्यार्थ्यांना माहिती देऊन त्यांच्यामध्ये एच.आय. व्ही / एड्सचा प्रतिबंध वसंसर्गाचा प्रसार कमी करण्याच्या दृष्टीकोनातून शालेय शिक्षक व शिक्षिका यांचे प्रशिक्षण आवश्यक आहे.या प्रशिक्षणामध्ये १)किशोरवयीन जीवन कौशल्य शिक्षण कार्यक्रमाची ( AEP ) ओळख , २) किशोरावस्थाआणि वाढते वय ,३) पौंगाडावस्थेतील प्रजननक्षम आणि लैंगिक आरोग्य, ४) मानसिक आरोग्य समस्या आणि मादकपदार्थांचा दुरुपयोग, ५) एच.आय.व्ही / एड्स आणि एस.टी.आय / आर.टी.आय विषयी मुलभूत माहिती, ६) एच.आय.व्ही/ एड्स प्रतीबंधाकरिता जीवन-कौशल्य, ७) HIV / एड्स (प्रतिबंध व नियंत्रण ) अधिनियम- २०१७. या बाबत संपूर्णमाहिती देऊन प्रशिक्षण देण्यात आले आणि जनजागृतीपर IEC साहित्य देण्यात आले.या प्रशिक्षणाला श्री. महेश भांडेकर (DPO), डॉ. अभिषेक गव्हारे (CSO) जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रणपथक अधिकारी , कु. विशाखा काटवले (ARSH समन्वयक), कु. वनिता अधाऊ (RKSK समुपेदेषक) आणि शिक्षक वशिक्षिका उपस्थित होते.