घुग्गुस येथील निर्माणाधीन रेल्वे ब्रीज वर 22 नोव्हेंबर पर्यंत जड वाहनांना प्रतिबंध

घुग्गुस येथील निर्माणाधीन रेल्वे ब्रीज वर

22 नोव्हेंबर पर्यंत जड वाहनांना प्रतिबंध

चंद्रपूर, दि.24 :  घुग्गुस शहरातील रेल्वे ब्रिजचे काम सुरू असल्याने वाहतुकीस कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही व वाहतुकीचे नियमण व्हावे. तसेच कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये, तसेच कायदा व सुव्यव्स्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याकरीता 30 जून 2024 पर्यंत अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती. परंतु सदर कालावधीमध्ये रेल्वे ब्रिजचे बांधकाम पुर्ण न झाल्याबाबत आर.के.मधानी कार्पोरेशन ॲण्ड गिरीराज या कंपनीचे पत्र प्राप्त झाल्याने 22 नोव्हेंबर 2024 पर्यंत सदर मार्गावरील सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी निर्ममीत केले आाहे.

        तरी अवजड वाहतुकदारांनी खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा. 1. घुग्गुस बसस्थानक ते म्हातारदेवीपर्यंत जड वाहतुकीस बंद राहील. 2.  घुग्गुस बसस्थानक ते राजीव रतन हॉस्पीटल – बेलोरा ओव्हर ब्रिज मार्गे वणी कडे जाणारा रस्ता जड वाहतुकीस बंद राहील.

पर्यायी मार्ग : 1. वणीकडून घुग्गुसकडे येणारी जड वाहतूक राजीव रतन हॉस्पीटल पर्यंत येऊ शकेल. 2.   वणीकडून घुग्गुस बसस्थानकाकडे जाण्यासाठी पाटाळा- कोंडा फाटा किंवा पाटाळा -वरोरा- भद्रावती- ताडाली-पडोली घुग्घूस मार्गाचा अवलंब करावा. 3. घुग्गुस कडून वणी जाण्याकरीता पडोली -भद्रावती – वरोरा मार्गाचा अवलंब करावा. वरिल निर्देशाचे पालन करून जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.