शालेय उपक्रमातुन स्वच्छतेचा जागर
स्वच्छता ही सेवा 2024
चंद्रपुर दिनांक 23/9/2024 स्वच्छता ही सेवा मोहिम मोठ्या स्वरुपात जिल्हा भर गावा – गावात विविध उपक्रम राबविल्या जात असुन , स्वच्छतेची महती ग्रामस्थांना व्हावी म्हणुन, शालेय विद्यार्थ्यांमध्ये विविध शालेय स्पर्धेचे आयोजन करुन, गावातील शाश्वत स्वच्छतेच्या जनजागृती करीता शालेय उपक्रमातुन स्वच्छतेचा जागर करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2024 या कालावधित “स्वच्छता हि सेवा” मोहीम देशभर राबविल्या जात असुन, जनमानसात शाश्वत स्वच्छतेचे महत्व पटवुन दिल्या जात आहे.या मोहीमेत शालेय स्तरावरील उपक्रमांवर भर दिलेला आहे. मानसिक परिवर्तनाचा भाग म्हणुन शालेय जिवनात असतांना ज्ञानार्जनासह स्वच्छतेचे धडे शालेय मनावर बिंबविण्याचा प्रयत्न या स्पर्धांमधुन केला गेला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा मधुन स्पर्धा आयोजनाचे निर्देश देण्यात आले आहे. यामध्ये स्वच्छता विषयावर आधारीत घोषवाक्य स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, कविता लेखन,रॅली, सायकल मॅरेथान, मानवी साखळी, घोषवाक्य स्पर्धा , पेंटींग स्पर्धा,प्रश्न मंजुषा, कचरा वर्गीकरण चर्चा, टाकावु पासुन टिकावु वस्तु तयार करणे. या स्पर्धांचा समावेश असुन, शालेय विद्यार्थी स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्पर्धा यशस्वी करण्यासाठी यत्रंणा कामाला लागली असुन , प्रत्येक तालुक्यातुन शालेय स्तरावर निर्देशित केल्यानुसार स्पर्धा राबविल्या जाणार आहे. स्वच्छता विषयक शालेय स्तरावरील स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या चांगल्या सवयी अंगवळणी लागणे व यातुन शालेय परिसर स्वच्छता, गावांची स्वच्छता , घराची स्वच्छता यासह वैयक्तिक स्वच्छता विषयीचे महत्व निर्माण होण्यास मदत होणार आहे. यासाठी सर्व शाळामधुन दिनांक 24 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2024 या कालावधीत स्वच्छता विषयक स्पर्धांचे आयोजन करावे . असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन व उपमुख्य कार्यकारी अधिकारी ,पाणी व स्वच्छता ,नूतन सावंत यांनी केले आहे.