आनंददायी रविवारची शाळा अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व चर्चा.

आनंददायी रविवारची शाळा अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व चर्चा.

मुख्य संपादक मिथुन मेश्राम 9923155166

विद्या प्रसारक संस्था द्वारा संचालित सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाही येथे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत आनंददायी रविवार ही संकल्पना राबविण्यात आली. शाळेत सकाळी सर्व विद्यार्थिनींना क्रिकेट, हॉकी, बुद्धिबळ, कॅरम,व्हालिबाल इत्यादी खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले.
त्यानंतर “भविष्यातील रोजगाराच्या संधी” या कार्यशाळेत राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक संतोष ननावार यांनी विद्यार्थिनींना करियर विषयक सखोल मार्गदर्शन केले.तसेच मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व खेळाडू यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता यादव, पर्यवेक्षक विलास धुळेवार, पत्रकार अमन कुरेशी,मिथुन मेश्राम व शाळेतील शिक्षक आणि बहुसंख्य विद्यार्थीनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किशोर कावळे यांनी केले. या उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष योगेंद्रजी जयस्वाल, सचिव अरविंदजी जयस्वाल यांनी शुभेच्छा दिल्या.