जिवनापूर येथे साप अंधश्रद्धा आणि विज्ञान या विषयावर स्वाब संस्थेचे मार्गदर्शन कार्यक्रम. व वृक्षारोपण

जिवनापूर येथे साप अंधश्रद्धा आणि विज्ञान या विषयावर स्वाब संस्थेचे मार्गदर्शन कार्यक्रम. व वृक्षारोपण

मुख्य संपादक मिथुन मेश्राम 9923155166

नागभीड तालुक्यातील जीवनापूर येथे ‘साप, अंधश्रद्धा व विज्ञान’ या विषयांतर्गत स्वाब संस्थेद्वारे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. हे कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेमध्ये घेण्यात आले.
या मार्गदर्शन कार्यक्रमात समाजातील अंधश्रद्धा, सापांविषयी च्या अंधश्रद्धा, सर्पदंशाच्या नंतर अंधश्रद्धेतून मृत्यू, त्यापासून वाचण्याची उपाय व विज्ञान आणि कायदा या विषयावर सविस्तर मार्गदर्शन या कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी सापाच्या विविध प्रजातींबद्दल माहिती देत
‘स्वाब संस्थेचे’ सर्पमित्र जीवेश सयाम यांनी यावेळी सापाच्या एकूण जाती, त्याचे विषारी निमविषारी व बिनविषारी असे तीन प्रकार आपल्या परिसरामध्ये आढळणाऱ्या विषारी जाती व बिनविषारी जाती, त्यांची ओळख विषांचे प्रकार, सर्पदंश होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, सर्पदंशाच्या नंतर काय काळजी घ्यावी, या संदर्भाने सविस्तर मार्गदर्शन सयाम यांनी सुरुवातीला केले.
तर त्यानंतर सापाबद्दलच्या विविध अंधश्रद्धा, साप चावल्यानंतर विदेशात व आपल्या देशात मरणाऱ्यांच्या संख्येची तफावत, यामागचे मुख्य कारण, आपल्या देशातील अंधश्रद्धा व नागमोत्याकडे जाऊन सापाचे जहर उतरत नाही तर शासकीय रुग्णालयातील एंटीवेनम्स मुळे माणसाचे जीव वाचू शकते, अंधश्रद्धेमुळे जीव गमावू नका असे सांगत त्याकरता लागू होणार्या जादूटोणाविरोधक कायद्या बद्दल सविस्तर माहिती, व वाघ व त्याचे पर्यावरणातील महत्त्व या बद्दल यश कायरकर यांनी माहिती दिली. यानंतर स्वाब टीम द्वारे जिवनपुर च्या अंगणवाडी परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी समाजातील विविध अंधश्रद्धेबद्दल संजय घोनमोडे अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा सदस्य यांनी माहिती दिली तर संचालन मस्के सर, जिल्हा परिषद उच्च सेमी इंग्लिश ,कार्यक्रमाची प्रस्तावना विषय शिक्षक रामटेक सर यांनी केले.
हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम प्रत्येक शाळेत राबण्याचा सुचना व आदेश अनुषंगाने मौजा जीवनापूर येथिल जिल्हा परिषद उच्च सेमी इंग्लिश शाळा येथे घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून  संजय घोनमोडे अ.भा.अंध्यश्रदा निर्मुलन समिती , पंडित मेकेवाड वनरक्षक आलेवाही बिट, मार्गदर्शक म्हणून यश कायरकर स्वाब संस्था अध्यक्ष तथा वन्यजीव संरक्षण अभ्यासक, जिवेश सयाम स्वाब संस्थेचे सपमीत्र मार्गदर्शक तलोधी, श्री रामदीन नान्हे सामाजिक कार्यकर्ते जिवनापुर, स्वाब टिमचे हितेश मुगमोडे, नितीन भेंडाळे, शुभम निकेशर, महेश बोरकर, अमन करकाडे, गिरीधर निकुरे, सुमित गुरनुले, तर मुख्याध्यापक सोनवणे मॅडम
साहाय्यक शिक्षक सेलोकर सर, साहाय्यक शि नोक्षिका जांबुळे मॅडम, तथा गावकरी उपस्थित होते.