बँक ऑफ इंडिया कडून जीवन ज्योती विम्याचा मिळाला लाभ

बँक ऑफ इंडिया कडून जीवन ज्योती विम्याचा मिळाला लाभ

मुख्य संपादक मिथुन मेश्राम 9923155166

सिंदेवाही :- मागील अनेक वर्षापासून केंद्र शासनाने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा सुरू केला असून कोठा ( गुंजेवाही ) येथील कौशल्याबाई पुंडलिक जेंगठे यांनी बँक ऑफ इंडिया मधून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा काढला होता. परंतु नुकताच त्यांचा अपघाती मृत्यू झाला असल्याने त्यांना बँक ऑफ इंडिया शाखा गुंजेवाही – सिंदेवाही मार्फत २ लाख रुपयाचा लाभ देण्यात आला.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा ही भारतातील सरकारचे पाठबळ असलेली एक जीवन विमा योजना आहे. या विम्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर ग्राहकाचा मृत्यू झाला तर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला २ लाख रुपयाचा लाभ देण्यात येतो. दरम्यान कोठा ( गुंजेवाही ) येथील महिला कौशल्याबाई पुंडलिक जेंगठे यांनी बँक ऑफ इंडिया कडून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा सुरू केला होता . परंतु १४ एप्रिल २०२४ ला त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या विम्याचा २ लाख रुपयाचा लाभ त्यांचे वारसदार धनराज पुंडलिक जेंगठे यांना देण्यात आला असून नुकतेच बँक ऑफ इंडिया शाखा गुंजेवाही – सिंदेवाही यांनी त्यांचे वारसदाराच्या खात्यात २ लाख रुपये जमा केले असून यावेळी बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक महेश पेंदोर, सह व्यवस्थापक प्रतीक गोंडाने, आकाश जिकर उपस्थित होते. मृतक व्यक्तीला प्रधानमंत्री जीवन ज्योती विम्याचा लाभ मिळण्यासाठी सह व्यवस्थापक प्रतीक गोंडाने यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून पाठपुरावा केला.