आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने भंडारा जिल्हयाची अंतिम मतदार यादी जाहिर
मुख्य संपादक मिथुन मेश्राम 9923155166
मा.भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने १ जुलै, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा द्वितीय विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविणेबाबत निर्देश दिले आहेत.
त्यानुसार दुस-या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 30/8/2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्ष प्रतिनिधी यांचे उपस्थितीत दि.30/8/24 रोजी सदर यादी प्रकाशनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा या ठिकाणी पार पडला. जिल्हयाची एकूण मतदार संख्या आता 10,07,555 इतकी आहे. तसेच स्त्री पुरुष मतदार गुणोत्तरामध्ये वाढ झाली असून ते 1002 इतके आहे. 18 ते 19 वयोगटातील युवा मतदार संख्या 22,279 इतकी असून दिव्यांग मतदार संख्या 7468 इतकी आहे.
जिल्हयातील 60-तुमसर, 61-भंडारा व 62-साकोली विधानसभा मतदारसंघाची मतदार संख्या अंतिम यादीनुसार खालीलप्रमाणे आहे.
मतदार संघाचे नाव | एकूण मतदान केंद्र संख्या | पुरुष मतदार | स्त्री मतदार | तृतीय पंथी मतदार | एकूण मतदार |
60-तुमसर | 353 | 154250 | 152477 | 1 | 306728 |
61-भंडारा | 435 | 185529 | 188296 | 3 | 373828 |
62-साकोली | 379 | 163594 | 163405 | 0 | 326999 |
एकूण | 1167 | 503373 | 504178 | 4 | 1007555 |
भंडारा जिल्हयातील तीनही विधानसभा मतदार संघामध्ये दिनांक 30/08/2024 रोजी सेनादलातील मतदार यादी देखिल प्रसिध्द करण्यात आली असून त्याबाबतचा तपशिल खालीप्रमाणे.
विधानसभा मतदार संघ व क्रमांक | पुरुष | स्त्री | एकूण सेनादलातील मतदार |
60-तुमसर | 715 | 29 | 744 |
61-भंडारा | 563 | 22 | 585 |
62-साकोली | 418 | 17 | 435 |
एकूण | 1696 | 68 | 1764 |
भंडारा जिल्हयातील एकूण मतदान केंद्रसंख्या 1167 इतकी असून एकूण 12 मतदान केंद्र वाढविण्यात आली आहेत. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी बाबत विशेष शिबिराद्वारे ऑनलाईन व ऑफलाईन प्राप्त अर्जानुसार मतदारांची नावे समाविष्ठ करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून याअंतर्गत तिनही विधानसभा मतदार संघामध्ये विद्यार्थ्यासाठी, महिलांसाठी व दिव्यांगासाठी भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्तीसाठी जिल्हयात विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली. त्यामुळे जिल्हयाची मतदारसंख्या लोकसभा निवडणूकी पश्चात 10,632 इतकी वाढली आहे.
भंडारा जिल्हयातील 60-तुमसर, 61-भंडारा व 62-साकोली विधानसभा मतदार संघाच्या दि.01/07/24 या अर्हता दिनांकावर आधारीत अंतिम मतदार यादीची प्रसिध्दी मतदान केंद्र स्तरावर, तालुकास्तरावर, उपविभागीय स्तरावर व जिल्हा स्तरावर दिनांक 30/08/2024 रोजी करण्यात आली आहे. सदर यादी जिल्हाधिकारी कार्यालयाचे वेब साईटवर (https:bhandara.gov.in/) वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. भारत निवडणूक आयोगाचे मतदार सेवा पोर्टल (https.//electoralsearch.eci.gov.in) या वेब साईटवर देखील मतदारांना आपले नाव, मतदान केंद्र इ.तपशील तपासुन घेतल्यास आगामी विधानसभा निवडणूक 2024 चे मतदाना दिवशी सुलभरित्या मतदान करता येईल. तसेच, ज्यांनी अद्याप नांव नोंदणी केली नाही, त्यांनी निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत आपले कार्यक्षेत्रातील मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे /तहसिलदार कार्यालय/मतदाता सेवा पोर्टल अथवा वोटर हेल्पलाईल ॲप (VHA) यावर मतदार नोंदणी करावी असे आवाहन मा.श्री योगेश कुंभेजकर, जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, भंडारा यांनी केले आहे.