युद्ध सन्मान योजना.

युद्ध सन्मान योजना

मुख्य संपादक मिथुन मेश्राम 9923155166

भंडारा  – 1965 आणि सन 1971 च्या युध्दामध्ये सक्रिय भाग घेतलेल्या अधिकारी/जवान/विधवा यांच्या करीता युद्ध सन्मान योजना राबविण्यात येत आहे.

            या योजनेमध्ये सन 1965 आणि सन 1971 च्या युध्दा मध्ये सक्रिय भाग घेतलेल्या आणि समर सेवा मेडल आणि/ किंवा पुर्वी स्टार्स मेडल आणि/ किंवा पश्चिमी स्टार्स मेडल प्राप्त व्यक्ती किंवा त्यांच्या पत्नी (SSCOs/ECOs, Regular Commissioned Officers) यांना केंद्रिय सैनिक कल्याण बोर्ड नवी दिल्ली यांच्या कडून एकरक्मी रु. 15 लाख देण्याचे प्रस्ताव विचाराधिन असल्याचे कळविले आहे.

             रक्कम रु. 15 लाख देण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत माजी सैनिक कल्याण विभागामार्फत विचाराधीन आहे. त्याकरीता त्यांच्याकडुन खालील प्रमाणे माहिती मागविण्या येत आहे.

1)   पद व नाव.

            2)  वय.

            3)  पत्ता व संपर्क क्रमांक.

            4)  धारण केलेल्या जमिनीचे क्षेत्र.

                  (शेत जमिन, प्लॉट, रहिवासी फ्लॅट/प्लॅाट).

            5)  मागील पाच वर्षांचा आयकर तपशील (आर्थिक स्थिती निश्चितीसाठी)

            6)  सध्याचा व्यवसाय.

            7)  सध्याचे वार्षिक अत्पन्न.

            वरील प्रमाणे माहिती व आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, भंडारा महसूल कर्मचारी भवन, भंडारा येथे संबंधितांनी जमा करणेचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रशांत पिसाळ यांनी केले आहे.