राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

मुख्य संपादक मिथुन मेश्राम 9923155166

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली व विविध खेळाच्या एकविध क्रीडा संघटना, शाळा / महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने दि. 29 ऑगष्ट, 2024 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले.
मेजर ध्यानचंद याचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राज्यामध्ये क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा, शहरी व ग्रामिण भागातील नागरीकांपर्यंत क्रीडा व खेळांचे महत्व पोहोचविणे, निरोगी राहण्याचा संदेश देणे, युवक – युवतींमध्ये क्रीडा विषयक वातावरण निर्माण व्हावे व क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व्हावे याकरीता भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी हॉकीचे जादुगर स्व. मेजर ध्यानचंद व भारताचे पहिले ऑलिंम्पिक मेडलीस्ट स्व. खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करुन भव्य रॅलीचे आयोजन सकाळी 09.00 वाजता करण्यात आले. सदर रॅलीमध्ये जिल्ह्यातील खेळाडू व क्रीडाप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. सदर रॅलीला जिल्ह्यातील राष्ट्रीय खो-खो खेळाडू कु. मोनिका सडमेक यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. सदर रॅलीमध्ये सहभागी खेळाडू व क्रीडाप्रेमींना टि-शर्टस् चे वाटप करण्यात आले.
रॅलीच्या समापनानंतर दिवसभरात विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल, रस्साखेच, खो-खो इत्यादी खेळांचे आयोजन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून दि. 26 ऑगष्ट 2024 पासून थ्रोबॉल, फुटबॉल, हॉकी, हॅन्डबॉल, बॅडमिंटन, कॅरम, बॉल बॅडमिंटन इत्यादी खेळांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सर्व खेळाडूंनी बहुसंख्येने सहभाग नोंदवून आपल्या क्रीडा कलेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. यामध्ये विविध शाळांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. अशा शाळांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यता आले.
सदर राष्ट्रीय क्रीडा दिनाचा समारोप सायंकाळी 05.00 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा व सांस्कृतीक भवन, कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे संपन्न झाला. सदर समारोप प्रसंगी प्राचार्य / मुख्याध्यापक गोंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिरोली, कार्मेल हायस्कुल, प्लॅटिनम ज्युबिली हायस्कुल, गडचिरोली, स्कुल ऑफ स्कॉलर्स, गडचिरोली, शिवाजी हायस्कुल, गडचिरोली, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, गडचिरोली, लोकबिरादरी माध्यमिक आश्रमशाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय, हेमलकसा उपस्थित होते. सदर अतिथींच्या हस्ते जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच सन 2022-23 व सन 2023-24 या सत्रात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्राविन्यप्राप्त करुन प्रथम, द्वितीय व तृतीय स्तरावर उच्चत्तम गुणांकण प्राप्त करणाऱ्या उपरोक्त सात शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदानाचे धनादेश वितरीत करुन सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच याप्रसंगी क्रीडा क्षेत्रात निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या क्रीडा मार्गदर्शक व शारीरिक शिक्षण शिक्षकांचा सत्कार मा. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. भास्कर घटाळे यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे यशस्वितेकरीता घनश्याम वरारकर, क्रीडा अधिकारी, एस.बी. बडकेलवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक, नाजूक उईके, राज्य क्रीडा मार्गदर्शक, श्रीराज बलोदे, क्रीडा अधिकारी, चंद्रशेखर मेश्राम, क्रीडा अधिकारी, विशाल लोणारे, वरिष्ठ लिपीक, खुशाल मस्के, तालुका क्रीडा संयोजक, गडचिरोली, रोशन सोळंके आर्चरी प्रशिक्षक, सुनिल चंद्रे, कुणाल मानकर, बाळू रामटेके, कैलास बावणे, सागर तुंकलवार, बादल तुंकलवार, श्रीमती संगिता निकुरे यांनी परिश्रम घेतले असे जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.