सन 2024-2025 या सत्रात राखीव प्रवर्गातुन व्यावसायीक पाठयक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी सुचना.

सन 2024-2025 या सत्रात राखीव प्रवर्गातुन व्यावसायीक
पाठयक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी सुचना.

मुख्य संपादक मिथुन मेश्राम 9923155166

गडचिरोली, सन 2024-25 मध्ये ज्यांना व्यावसायीक अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी समितीकडे विहीत नमून्यात आवश्यक कागदपत्रासह /पुराव्यासह त्वरीत अर्ज सादर करावे. व ज्यांचे अर्ज त्रुटीत आहेत त्यांनी आवश्यक पुराव्यासह त्रुटी पूर्तताकरीता दि.05 सप्टेंबर 2024 रोजी कार्यालयीन वेळेत आवश्यक दस्ताऐवजासह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय.टी.आय.चौक, एल.आय.सी. रस्ता, कॉम्प्लेक्स, गडचिरोली या कार्यालयात उपस्थित होऊन सादर करावे. असे आवाहन उपायुक्त़ देवसुदन ना. धारगावे यांनी केले आहे.