भात पड क्षेत्रात रब्बी हंगामात लागवड करावी- जिल्हाधिकारी.

भात पड क्षेत्रात रब्बी हंगामात लागवड करावी– जिल्हाधिकारी.

मुख्य संपादक मिथुन मेश्राम 9923155166

भंडारा जिल्हा भात पिकासाठी  प्रसिध्द असून जिल्हयात मोठ्या प्रमाणात तलाव / बोडी उपलब्ध आहेत. तसेच जिल्हयात सरासरी १२९८ मि.मी. पाऊस होतो त्यामुळे ओलीताची मुबलक उपलब्धता आहे. जिल्हयात खरीप हंगामात १ लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होत असते. त्या प्रमाणात रब्बी व उन्हाळी हंगामाची मिळुन एकुण १ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्र हे भात पड क्षेत्र रहाते. हे पड रहाणारे क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी  जिल्हाधिकारी, भंडारा यांचे अध्यक्षतेखाली नियोजन करण्यासाठी सभा घेण्यात आली. त्यावेळेस जिल्हाधिकारी, योगेश कुंभेजकर यांनी या क्षेत्रावर रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले.

भात पड क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी झालेल्या ऑनलाईन नियोजन सभेस श्रीमती वसुमना पंत संचालक, वनामती, नागपुर, डॉ. अभय शिरोळे, राष्ट्रीय मृद सर्वेक्षण नागपुर, श्री संजय चिचघरे, महाराष्ट्र सूदूर सर्वेक्षण., श्री पराते, अधिक्षक अभियंता पाटबंधारे विभाग, भंडारा, श्रीमती संगिता माने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,  व श्रीमती उर्मिला चिखले, प्रकल्प संचालक (आत्मा), हे हजर होते.

भांत पड क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी प्रत्येक तालुक्यात असे क्षेत्र निर्धारित करून त्यावर लागवडीसाठी नियोजन करण्याबाबत सुचना दिल्यात आवश्यकता असल्यास वनामती मार्फत कडधान्य व गळीत धान्य पिकाचे प्रशिक्षण हंगाम सुरू होण्यापुर्वी आयोजीत करावे. जास्तीत जास्त भात पडीत क्षेत्र रब्बी हंगामात लागवडीखाली आणावे याकरीता मोहाडी तालुक्यात विशेष प्रकल्प राबविण्यात यावा अशा सूचना  जिल्हाधिकारी, भंडारा यांनी दिल्यात.