स्वच्छता ग्रीन लिफ रेटिंग प्रणाली जिल्यात राबवा.- विनय गौडा हॉटेल्स, लॉज, धर्मशाळांना मिळणार मानांकन

स्वच्छता ग्रीन लिफ रेटिंग प्रणाली जिल्यात राबवा.- विनय गौडा

हॉटेल्स, लॉज, धर्मशाळांना मिळणार मानांकन

स्वच्छता ग्रीन लिफ रेटिंग प्रणाली पर्यटकांना मिळणार दर्जेदार सुविधा

मुख्य संपादक मिथुन मेश्राम 9923155166

 चंद्रपुर- भारतीय अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्राचा मोठा हिस्सा असून, पर्यावरण रक्षणार्थ हागणदारीमुक्ती, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय सुविधांची उपलब्धी पर्यटकांना प्रभावित करणाऱ्या असतात. या पार्श्वभूमीवर पर्यटकांना सुविधा पुरवणाऱ्या हॉटेल्स, लॉज, धर्मशाळा, होमस्टेज, कॅम्पस मधून स्वच्छता सुविधा अधिक दर्जेदार मिळण्यासाठी स्वच्छता ग्रीन लिफ रेटिंग ऑनलाइन प्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे. त्यानुसार संबंधित आस्थापनांना मानांकन देण्यात येणार आहे. या बाबत जिल्ह्याधिकारी विनय गौडा यांच्या अध्येक्षते खाली जिल्हास्तरीय समितीची सभा विसकलमी सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकतीच घेण्यात आलेली असुन, स्वच्छता ग्रिनलिफ़ रेटींग प्रणाली जिल्यात राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पेयजल मंत्रालय तसेच पर्यटन मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील ग्रामीण, शहरी भागातील पर्यटक अनुकुल स्वच्छता सुविधांचे मुल्यमापन करणे (ग्रीन लिफ रेटिंग इन हॉस्पॉलिटी फॅसिलिटीज) प्रस्तावित आहे. त्यामुळे सेवा क्षेत्रातील स्वच्छता सुविधा अधिक दर्जेदार होण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. मुल्यांकनामुळे अशा व्यवसायिक आस्थापनांमध्ये विधायक स्पर्धेचे वातावरण निर्माण होवून त्याचा पर्यटणवृध्दीत उपयोग होवून, देशाची प्रतिमा जागतिक पातळीवर उंचावण्यास मदत होणार आहे.

मानांकन करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन, सदस्य सचिवपदी प्रकल्प संचालक जलजीवन मिशन तथा जिल्हा समन्वयक स्वच्छ भारत मिशन नूतन सावंत, सदस्य पदी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत),पर्यटन विभाग / एमटीडीसी जिल्हा प्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने पर्यटन /हॉटेल उद्योगातील प्रतिनिधींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

संबंधित आस्थापनांच्या पडताळणीसाठी तालुका स्तरावर उपविभागीय दंडाधिकारी (प्रांताधिकारी) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी,  उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, स्वच्छ भारत मिशनचे विस्तार अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. हॉटेल, लॉज, होमस्टे, धर्मशाळा आणि पोर्टेबल टॉयलेट असलेले कॅम्पस हे लक्ष गट आहेत. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या सहकार्याने नोव्हेंबर २०२३ मध्ये रॅकिंग योजना सुरु केली आहे. यामध्ये पर्यटन आस्थापना एक ग्रिन लिफ़ रेटींग मिळवण्यासाठी एकुण 200 गुणा पैकी 100 ते 130 गुण मिळवणे आवश्यक आहे. तीन ग्रिन लिफ़ रेटींग मिळवण्यासाठी 200 गुणा पैकी 130 ते 180 गुण मिळवणे आवश्यक आहे. पाच ग्रिन लिफ़ रेटींग मिळवण्यासाठी एकुण 200 गुणा पैकी 180 ते 200 गुण मिळवणे आवश्यक आहे.

इच्छित स्वच्छता विषयक मापदंड साध्य करण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित करुन, वर्तमान मुल्यांकन प्रमाणपत्र स्थितीबाबत जिल्ह्याला प्रपत्र सादर करण्यात येणार आहे. पडताळणी टप्प्यात उपविभागीय अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या पडताळणी उपसमितीमध्ये आरोग्य, प्रदूषण नियंत्रण मंडळ व इतर प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे. या बाबत जिल्ह्याधिकारी विनय गौडा यांच्या अध्येक्षते खाली जिल्हास्तरीय समितीची सभा विसकलमी सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकतीच घेण्यात आली .यामध्ये स्वच्छता ग्रिनलिफ़ रेटींग प्रणाली जिल्यात राबविण्याचे आवाहन करण्यात आले असुन, स्वच्छता ग्रिनलिफ़ रेटींग मध्ये जिल्यातील सर्व आस्थापनांना स्वताहुन सहभागी होण्याच्या सुचना जिल्ह्याधिकारी विनय गौडा यांनी केल्या. सदर सभेला जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन, प्रकल्प संचालक जलजीवन मिशन तथा जिल्हा समन्वयक स्वच्छ भारत मिशन नूतन सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मीना साळुंखे, रिसोर्ट युनियनचे उपाध्यक्ष संजय ढिमोले उपस्थित होते.