मच्छिमार, मत्स्यसंवर्धक ,मत्स्य कास्तकारांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा Ø 14 घटकांसाठी कर्जदर निश्चित

मच्छिमारमत्स्यसंवर्धक ,मत्स्य कास्तकारांनी

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा

Ø 14 घटकांसाठी कर्जदर निश्चित

मुख्य संपादक मिथुन मेश्राम 9923155166

चंद्रपूर : मच्छीमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्य कास्तकार यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून   सन 2024-25 या वर्षांकरतिा राज्यस्तरीय समितीने कर्जदर निश्चित केले आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त डॉ. अतुल पाटणे यांनी केले आहे.

            सर्वजाती मत्स्यपालनकरीता प्रति हेक्टर शेततळे 5 लाख रुपये कर्ज दर निश्चित करण्यात आला आहे. नदी, तलावामध्ये छोट्या नावेच्या सहाय्याने मासेमारी 80 हजार रुपये, निमखारे पाण्यातील सर्वजाती मत्स्यपालन प्रति हेक्टर 3 लाख रुपये,  निमखारे पाण्यातील कोळंबी संवर्धन प्रति हेक्टर 3 लाख रुपये, टॉलर मच्छीमार नौका 3 लाख रुपये,  पर्सिसीन मच्छीमार नौका 3 लाख रुपये, गील नेटर मच्छीमार नौका 3 लाख रुपये, बिगर यांत्रिक मच्छीमार नौका 80 हजार रुपये, यांत्रिक मच्छीमार नौका 1 लाख 50 हजार रुपये, शोभीवंत मत्स्यपालन 1 लाख रुपये, गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय 2 लाख रुपये , पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन 50 हजार रुपये अशा एकूण 14 घटकांना कर्जदर निश्चित करण्यात आलेला आहे.

            राज्यातील जास्तीत जास्त मच्छिमार, मत्स्यसंवर्धक ,मत्स्यकास्तकार यांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा  लाभ घेण्यासाठी जिल्हयाचे सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे मत्स्यव्यवसाय विकास विभागाने कळविले आहे.