गणेश मंडळांना देणगी गोळा करण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक Ø  धर्मादाय आयुक्तांकडे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

गणेश मंडळांना देणगी गोळा करण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक

Ø  धर्मादाय आयुक्तांकडे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

मुख्य संपादक मिथुन मेश्राम 9923155166

चंद्रपूर,  जिल्ह्यातील गणेशा मंडळातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाकरिता (सार्वजनिक विश्वसत व्यवस्था वगळून इतरांना) रोख रकमेच्या किंवा वस्तूच्या स्वरुपात कोणताही पैसा, वर्गणी  किंवा  देणगी गोळा करण्याकरीता महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41- क नुसार सहायक धर्मादाय आयुक्त, चंद्रपूर यांची  पूर्वपरवानगी घ्यावी. त्याकरीता   www.charity.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर  आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन अर्ज करून सहायक धर्मादाय आयुक्त, चंद्रपूर यांचे कडून ऑनलाईन परवानगी / प्रमाणपत्र देण्यात येईल.

अर्जासोबत दाखल करावयाची कागदपत्रे : 1 अर्ज पूर्णपणे भरलेला असावा. 2. मंडळाच्या सर्व सदस्यांची स्वाक्षरी  असलेल्या ठरावाची प्रत. 3. सर्व सदस्यांचे ओळखपत्र  4. जागेबाबत जमीन मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र 5. नगरसेवक, सरपंच किंवा प्रतिष्ठित व्यक्ती यांचे शिफारसपत्र 6. विद्युत बिलाची प्रत 7. 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र 8. मागील वर्षीचे  परवानगीची प्रत 9. मागील वर्षाचे जमा खर्चाचा हिशोब.

कलम 41 क  च्या तरतुदींचे उल्लंघन करून, सहायक धर्मादाय आयुक्त, चंद्रपूर यांची परवानगी न घेता पैसा, वर्गणी किंवा देणगी गोळा केल्यास व तसा दोषसिध्द झाल्यास, तीन महिन्यापर्यंत साध्या कारावासाची किंवा संकलित रकमेच्या किंवा अंशदानाच्या दीडपटीपर्यंत द्रव्यदंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा होतील. त्यामूळे सर्व मंडळानी वर्गणी गोळा करण्यापूर्वी रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे, असे सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने कळविले आहे.