‘स्वयंसिद्ध (कराटे) प्रशिक्षण’ घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न • अतिदुर्गम भागातील आश्रम शाळेतील एकुण १६३ विद्यार्थीनींनी…

गडचिरोली पोलीस दल व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, भामरागड यांचे संयुक्त विद्यमाने “प्रोजेक्ट उडान” अंतर्गत ‘स्वयंसिद्ध (कराटे) प्रशिक्षण’ घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

• अतिदुर्गम भागातील आश्रम शाळेतील एकुण १६३ विद्यार्थीनींनी घेतले ‘स्वयंसिद्ध’ (कराटे) चे प्रशिक्षण.

मुख्य संपादक मिथुन मेश्राम 9923155166

गडचिरोली जिल्हा माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशिल जिल्हा असून येथील दुर्गम अतिदुर्गम भागात राहणाऱ्या युवक/युवतींना विविध खेळांमध्ये प्रोत्साहन देण्याकरीता व त्यांच्या क्रिडागुणांना वाव मिळण्याकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये बुध्दीबळ, कबड्डी, व्हॉलीबॉल व मॅरेथॉन यासारखे अनेक उपक्रम राबविले जातात. विविध खेळांच्या स्पर्धेच्या माध्यमातून युवक व युवतींना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उंचविता यावे या उद्देशाने गडचिरोली पोलीस दल व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय भामरागड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून दिनांक ०९/०८/२०२४ ते १८/०८/२०२४ व १९/०८/२०२४ ते २८/०८/२०२४ रोजी पर्यंत दोन सत्रांमध्ये ‘स्वयंसिद्ध’ (कराटे) प्रशिक्षणाचे आयोजन पोलीस मुख्यालय परिसरातील शहिद पांडू आलाम सभागृहामध्ये करण्यात आले होते. सदरचे ‘स्वयंसिद्ध’ (कराटे) प्रशिक्षण यशस्वीरीत्या पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्याचा निरोप संमारंभ कार्यक्रम आज दि. २८/०८/२०२४ रोजी एकलव्य हॉल येथे पार पडला.

सदर आयोजित स्वयंसिद्ध (कराटे) प्रशिक्षणामध्ये अतिदुर्गम भामरागड, एटापल्ली व हेडरी उपविभागातील आश्रम शाळेतील विद्यार्थीनींनी आपला सहभाग नोंदविला होता. यामध्ये दोन सत्रांमधील एकुण १६३ विद्यार्थीनींना स्वयंसिद्ध (कराटे) चे प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमांतर्गत सहभागी विद्यार्थीनींना आपले आत्मसंरक्षण कसे करावे या प्रशिक्षणामध्ये अवगत करुन देण्यात आले. तसेच आंतरवर्गात सायबर क्राईम, महिलांच्या संबंधी गुन्हे, गडचिरोली मधील माओवादाचे भिषण वास्तव व कम्युनिटी पोलीसींग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, स्वयंसिद्धचे (कराटे) प्रशिक्षण हे अत्यंत महत्वाचे प्रशिक्षण आहे व हे प्रशिक्षण फक्त तुम्हाला वाचविण्यासाठी नसून तुमचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. सर्व सहभागी विद्यार्थीनींनी आवडीने सहभागी होऊन सदरचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबत अभिनंदन केले.

यावेळी निरोप समारंभ कार्यक्रमास पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, कौशल्य स्पोर्ट्स अकॅडमी गडचिरोलीचे प्रशिक्षक श्री. प्रशिक रायपूरे व सेजल गद्देवार हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच प्रभारी अधिकारी नागरी कृती शाखा पोउपनि. धनंजय पाटील, पोउपनि. चंद्रकांत शेळके व सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.