वाघाला पकडण्यात वन विभागाला यश, दोन दिवसात दोन लोकांचे घेतले होते बळी

वाघाला पकडण्यात वन विभागाला यश, दोन दिवसात दोन लोकांचे घेतले होते बळी

ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या नागभीड व तळोधी या दोन्ही वनपरिक्षेत्रातील दोन लोकांना दोन दिवसांत मारणाऱ्या वाघाला जोरबंद करण्यात तळोदी पण विभागाला यश आले आहे.
सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की नागभीड वनपरिक्षेत्रातील दोडकू शेंदरे या इसमास व तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील देवपायली बिटातील जनाबाई बागडे या महिलेला ठार मारणाऱ्या वाघाला सापळा रचून पकडण्यात आले.
यावेळी याकरिता मुख वन संरक्षक रामगावकर यांनी परवानगी देत या वाघाला पकडण्याचे आदेश केले होते. त्यानंतर ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी चे उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा यांच्या मार्गदर्शनात घटनास्थळाच्या काही अंतरावरच आज दुपारी एक वाजून तिस मिनिटांनी(1:30) या वाघाला बेहोस करून पकडण्यात आले.
यावेळी डॉक्टर रमाकांत खोब्रागडे, शुटर अजय मराठे यांनी या वाघाला बेशुद्ध केले. यावेळी ब्रह्मपुरी वन विभागाचे बायोलॉजिस्ट राकेश आहूजा, तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार यांचे मार्गदर्शनामध्ये तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील संपूर्ण वनकर्मचारी , चिमूर येथील गस्तीपथक व स्वाब संस्थेचे बचाव पथकाचे यश कायरकर , जिवेश सयाम, नितीन भेंडाळे, छत्रपती रामटेके व इतर सदस्य उपस्थित होते.
या वाघाला पकडण्याच्या कारवाईनंतर परिसरातील लोकांनी वनविभागाचे कौतुक करत सुटकेचा निस्वास सोडला.