ICICI फाउंडेशन तर्फे शेतकऱ्यांना फळझाड वाटप व मार्गदर्शन कार्यक्रम

ICICI फाउंडेशन तर्फे शेतकऱ्यांना फळझाड वाटप व मार्गदर्शन कार्यक्रम
सिंदेवाही
आज दि.26/7/2024 रोजशुक्रवार ला कुकडहेटी ग्रामपंचायत येथे ICICI फाउंडेशन च्या वतीने कुकडहेटी ग्रामपंचायत व विरव्हा ग्रामपंचायत येथिल शेतकऱ्यांना विनामूल्य केशर आंब्यांचे झाडे वाटप करण्यात आले, कार्यक्रमा प्रसंगी शिवणी वनपारिक्षेत्र अधिकारी मा. गलगट साहेब, उपवनपरीक्षेत्र कुकडहेटी येथिल क्षेत्र सहाय्यक मा. बुल्ले साहेब यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले,ICICI फाउंडेशन चे विकास अधिकारी सतीश सामृतवार सर यांनी विविध योजने बाबत माहिती दिली व फाउंडेशन राबवित असलेल्या योजना वन्य जीव संघर्ष कमी कसे करता येईल आणि शेतकऱ्यांची आर्थिक बचत कशी होईल या हेतूने योजना राबविण्यात येत आहे, या वर्षी कारला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे व नेट देण्यात आली, वाडी प्रोजेक्ट करिता इच्छुक शेतकऱ्यांना प्रती 40आंब्यांचे झाड देण्यात येत आहेसांगितले,कार्यक्रमा करिता आशिष गजभे पो. पा.,महेश जांभुळे, दादाजी गरमळे गेविदासजी चौधरी,मनोहर दोडके,लक्ष्मीताई वेलादी,नीलकंठ मोहुर्ले, प्रकाशजी धारणे व शेतकरी बहुसंख्येनी उपस्थित होते.