मागील वर्षभरात नैसर्गिक आपत्ती मुळे झालेले पिक नुकसानच्या अनुषंगाने  तातडीने ई-केवायसी 31 जुलै 2024 पुर्वी पुर्ण करुन घ्यावे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन

मागील वर्षभरात नैसर्गिक आपत्ती मुळे झालेले पिक नुकसानच्या अनुषंगाने

 तातडीने ई-केवायसी 31 जुलै 2024 पुर्वी पुर्ण करुन घ्यावे.

–         जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा

भंडारा, दि. 26 : पूर, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, किडींचा हल्ला इ. नैसर्गिक आपत्तींमुळे शेतपीकांचे होणारे नुकसानामध्ये थेट शेतकऱ्यांचे खात्यात मदत निधी जमा करण्याची कार्यवाही अंमलबजावणी करण्यात येत आहे. मागील वर्षभरात बहुतांश शेतकऱ्यांचे खात्यात मदत जमा झाली आहे. तथापी जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचे ई-केवायसी अपुर्ण असल्याने त्यांचे खात्यात अद्याप मदत निधी जमा झालेला नाही.

त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की ज्यांचे ई-केवायसी अपुर्ण आहे त्यांनी तात्काळ आपल्या नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्र, आधार केंद्र, सी.एस.सी. केंद्र येथे जाऊन तातडीने आपले केवायसी अद्यावत करण्याची कार्यवाही दिनांक 31 जुलै 2024 पुर्वी पुर्ण करुन घ्यावी जेणेकरुन त्यांचे खात्यात सदरचा मदत निधी जमा करणे शक्य होईल. तर सदरचे अनुषंगाने तातडीने कार्यवाही करुन घ्यावी असे जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे.