पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य आजाराबाबत
काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
गडचिरोली,दि.26 :जिल्ह्यात या वर्षी पवसाळ्यात पुरपरिस्थीती उद्भवलेली आहे, या अनुषंगाने संभाव्य जलजन्य व किटकजण्य आजार टाळण्यासाठी जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग विविध उपाययोजना राबवत आहे. नागरिकांनी पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य आजाराबाबत काळजी घेण्याचे आरोग्य विभागाने आवाहन केले आहे त्यासाठी जनजागृती तसेच विविध उपयोजना सर्व विभागाच्या समन्वयाने राबवल्या जात आहेत.
यामध्ये नागरिकांनी जलजन्य आजाराबाबत काळजी घ्यावी यामध्ये
* शिळे आणि उघड्यावरील अन्न खाऊ नका.
* घरात आणि घराभोवती माशा होऊ नयेत यासाठी स्वच्छता ठेवा.
* साथीच्या काळात पिण्याचे पाणी उकळून गार करून प्या.
* लहान मुले आणि गरोदर माता यांना पिण्याचे पाणी उकळून गार केलेले द्या.
* पिण्याच्या पाण्याबाबत योग्य काळजी घ्या.
* आपल्या गावातील परिसरातील पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण नियमित होते आहे ना याबाबत खातरजमा करा.
* ज्या ठिकाणी स्वच्छता पाळली जात नाही अशा हॉटेल किंवा इतर ठिकाणी खाणे, पाणी पिणे टाळा. बाहेरील बर्फ खाणे टाळा.
* घराबाहेर पडताना प्रवासात आपल्या सोबत पाणी ठेवा, जेणे करून कुठलेही पाणी पिण्याची वेळ येणार नाही.
तसेच किटकजन्य आजरबाबत
दर आठवड्याला घरातील पाण्याची भांडी मोकळी करा व आतून स्वच्छ घासून पुसून घ्या.
* रिकाम्या न करता येणाऱ्या भांड्यामध्ये दर आठवड्याला आरोग्य कर्माचारी मार्फत अळीनाशक द्रावण (टेमीफॉस) टाका.
* घरावरील तसेच घरातील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावा.
* जुने टायर्स, नारळाच्या करवंट्या, पाणी साचू शकेल अशा फुटलेल्या बाटल्या, प्लास्टिकच्या वस्तू अशा निरुपयोगी वस्तू घराभोवती साठू देऊ नका.
* घरातील फुलदाण्या, कुलर्स, फ्रिज यांमध्ये साचलेले पाणी दर दोन-तीन दिवसांनी काढा.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साथरोग नियंत्रण कक्ष सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र ,तालुकास्तर तसेच जिल्हास्तरावर कार्यन्वीत आहे , जलजन्य व किटकजण्य साथ उद्भवल्यास तात्काळ नियंत्रण मिळवले जाणार आहे.तसेच हिवताप विभागामार्फत साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे , कंटेनर तपासणी नियमित ताप रुग्ण सर्व्हेक्षण चालू आहे तसेच आठवडी दर मंगळवार कोरडा दिवस व दर शनिवारी गप्पी मासे सोडण्याचा दिवस बाबत आदेश निर्गमित करण्यात आले असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ पंकज हेमके यांनी सांगितले . जलजन्य आजाराबाबत पाणी शुद्धीकरण, ब्लिचिंग पॉवडर तसेच मेडिक्लोर चा योग्य वापर करण्याच्या बाबत साथरोग अधिकारी डॉ रुपेश पेंदाम यांनी सूचना दिल्या आहेत.