जमीन विकास परवानगी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच नोंदनिकृत करा
काही अडचण उद्भवल्यास संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा
भंडारा,दि.26 : १ जानेवारी, २०२४ पासून सर्व विकास परवानगी ऑनलाईन पद्धतीने देण्याचे निर्देश आहेत. त्याकरीता शासनाद्वारे BUILDING PERMISSION MANAGEMENT SYSTEM (BPMS) / AUTO DCR है पोर्टल विकसीत करण्यात आले आहे. त्यान्वये संपूर्ण भंडारा जिल्हयात यापुढे विकास परवाणगी जसे बांधकाम परवानगी, अभिन्यास परवानगी, भूखंड एकत्रिकरण / विभाजन इत्यादी ऑनलाईन पद्धतीने BPMS / AUTO DCR पोर्टलद्वारे देण्यात येत आहेत. सदर प्रणाली भंडारा जिल्हात कार्यान्वीत झालेली असून यापुढे जमीन विकास परवानगी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच नोंदनिकृत अभियंत्याच्या मार्फत स्विकारण्यात येत आहेत व सर्व परवानगी या ऑनलाईन पद्धतीनेच देण्यात येत आहेत. नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने विकास परवानगी घेण्यास अडचणी उद्भवल्यास त्याबाबतचे मार्गदर्शन संबंधीत कार्यालय तसेच नोंदनीकृत अभियंता यांचेमार्फत देण्यात येईल.असे सहाय्यक संचालक नगर रचना विभागानी कळविले आहे.