अनुसुचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशी  शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

अनुसुचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशी  शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

भंडारा,दि.25 : शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक पशिशि- २०१५/प्र.क्र.३३४/का.१२ दिनांक १६ मार्च २०१६ शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक १५२२/प्र.क्र.१२ (भाग-२)/का.१२ दिनांक ०७ मार्च २०२४  शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक १५२२/प्र.क्र. १२ (भाग-१)/का.१२ दिनांक १२जुलै २०२४ राज्यातील अनुसुचित जमातीच्याविदयार्थानापरदेशात पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे व त्यासाठी शिष्यवृती देण्याची योजना विभागाने दिनांक ३१मार्च २००५ चे शासन निर्णयानुसार आयुक्तालय स्तरावर राबविण्यात येत आहे,

तसेच दिनांक१६ मार्च २०१६चे शासन निणर्यान्वये प्रस्तुत योजनेचा लाभ मिळणेसाठी विदयार्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा रु.६.०० लाखहोती. आतादिनांक ०७ मार्च २०२४ व्याशासन निणर्यान्वये कुटुंबाचे वार्षिकउत्पन्न कमाल मर्यादा रु.८.०० लाखपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच पदवी पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी वर्ल्ड रॅकींग

२०० च्या आतील परदेशातील शैक्षणीक संस्थेमध्ये प्रवेश घेतील अशा ४० विद्यार्थ्यांना प्रती वर्षी परदेश शिष्यवृती मंजुर करण्यात येईल

परदेशात शिष्यवृत्ती साठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा जि. भंडारा या कार्यालयातुन विहीत नमुन्यात शिष्यवृत्तीसाठी अर्ज नमुना विनामुल्य प्राप्त करुन परिपुर्ण माहिती भरुन व त्यासोबत आवश्यक कागदपत्र प्रमाणित प्रतिसह अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा जि. भंडारा यांचे कार्यालयामार्फत  अपर आयुक्त, आदिवासी विकास नागपुर यांचेकडे सादर करावयाचे आहेत. सदर योजनेचा अनुसुचित जमातीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान श्री. निरज मोरे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा, यांनी केले आहे.