फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी प्रशिक्षणाचे आयोजन

फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी प्रशिक्षणाचे आयोजन

         भंडारा,दि.25: भारत सरकार, महाराष्ट्र शासन एवं बँक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, भंडारा संस्थेद्वारा नि:शुल्क प्रशिक्षण कार्यक्रमाचे २९ जुलै २०२४  पासून    फोटोग्राफी व व्हिडिओ ग्राफीचे  30  दिवसीय  प्रशिक्षण  सुरु  होत  आहे. प्रशिक्षणामध्ये  आउट  डोअर  लाइटिंग, उपलब्ध  प्रकाश  फोटोग्राफी, स्टुडिओ व्यवस्थापन, घरातील प्रकाश व्यवस्था फोटोग्राफी, मॅक्रो शूटिंग, स्पोर्ट शूटिंग, चित्र रचना आणि त्याचे विविध टप्पे, दिवसाच्या प्रकाशात आणि पार्टीमध्ये फ्लॅश फोटोग्राफी, अल्बम, आर्किटेक्चर  शूटिंग  आणि  फील्डची  खोली  कशी  कव्हर करावी,

            व्हिडिओ कॅमेराचे प्रकार आणि त्यांचे सामान, DSLR सह व्हिडिओ शूटिंग, व्हिडिओ संपादन आणि ऑडिओ डबिंग, संगणक फोटोशॉप सिद्धांत, फोटो संपादन साधने, इव्हेंट शूटिंग सिद्धांत, पांढरा समतोल, रंग संतुलन आणि एक्सपोजर, फोटो पत्रकारिता आणि विभाग, डॉक्युमेंट्री – बातम्या गोळा करणे, पीपी सेट कटिंग आणि पेस्टिंग फोटो डिझाइन करणे, इत्यादी. प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थीना जेवण , चाय , नास्ता , वही , पुस्तके व  राहण्याची  सोय आदी  मोफत  केली  जाईल. स्वयंरोजगाराची आवड , व्यवसाय करण्याची  तयारी असणारे  वय १८ ते ४५ वर्षे, शिक्षण दहावी पास किंवा नापास अश्या पुरुष मंडळी नी मुलाखती करिता २९ जुलै २०२४   सकाळी 10 वाजता  बी. ओ. आय.  स्टार  स्वरोजगार प्रशिक्षण  संस्था लालबहादूर शास्त्री (मनरो) शाळेच्या बाजूला शास्त्री चौक भंडारा  येथे  उपस्थित राहण्याचे आव्हान  संस्थेचे  निर्देशक  मिलिंद  इंगळे  यांनी  केले आहे. या  करिता संर्पक क्र.  9511875908, 8669028433, 9766522984,8421474839 यावर अधिक माहिती  साठी संपर्क सांधावा.