संस्कार भारतीचा गुरुसन्मान सोहळा 28 जुलै रोजी चित्रकार प्रल्हाद ठक होणार सन्मानित

संस्कार भारतीचा गुरुसन्मान सोहळा 28 जुलै रोजी
चित्रकार प्रल्हाद ठक होणार सन्मानित

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून संस्कार भारती चंद्रपूर तर्फे दि. 28 जुलै रोजी गुरु सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक भवानजी भाई चव्हाण हायस्कूल येथे सकाळी 11 वाजता हा सोहळा सम्पन्न होणार आहे.

आनंदवन वरोरा येथील जागतिक कीर्तीचे चित्रकार व रांगोळीकार श्री प्रल्हाद ठक यांचा सन्मान गुरु या नात्याने करण्यात येणार आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी या नात्याने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सौ नंदिनीताई देवईकर यांची उपस्थिती राहणार आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने ऋतू हिरवा हा पाऊस गीतांचा कार्यक्रम संस्कार भारतीचे पदाधिकारी व सदस्य सादर करणार आहे. यात गीत, नृत्य, कविता अशी विविधता असणार आहे.
गुरु सन्मान सोहळा तसेच ऋतू हिरवा या दोन्ही कार्यक्रमांना चंद्रपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्कार भारती चंद्रपूर तर्फे करण्यात आले आहे.