शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी ई-समृध्दी पोर्टलवर नोंदणी करा

शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी ई-समृध्दी पोर्टलवर नोंदणी करा

Ø आधारभुत किमतीनुसार मका, तूर, चना, मुग, उडीद व सोयाबीन खरेदी होणार

चंद्रपूर, दि. 22 :  महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व नाफेड कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे हंगाम 2024-25 मध्ये ही राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत  दरानुसार नाफेडमार्फत मका, तुर,चना,मुग, उडिद व सोयाबीन  खरेदी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी (e-Samriddhi) ई समृध्दी पोर्टल सुरू केले असुन नाफेड मार्फत राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावा व जास्त शेतकऱ्यांनी (e-Samriddhi)  ई-समृध्दी  पोर्टलवर नोंदणी करून आपल्या शेतमालाला योग्य दर घ्यावा, याकरीता सदर  पोर्टलची  निर्मिती करण्यात आली आहे.

त्यामुळे सर्व शेतक-यांनी https://esamridhi.in/#login या सांकेतस्थळाला भेट देवून आपल्या शेतमालाची एमएसपी दराने विक्री करण्यासाठी ई-समृध्दी पोर्टलवर खरेदीकरीता नोंदणी करावी.  तसेच केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा.

ई-समृध्दी पोर्टलवरील नोंदणीच्या अडचणीबाबत व अधिक माहितीसाठी जिल्हा पणन अधिकारी, चंद्रपूर (मो. क्रमांक 8828501090) तसेच प्रतिनिधी श्रीकांत चिद्रेवार (9096030742) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही.एस. तिवाडे यांनी कळविले आहे.