जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटनांचे दस्ताऐवज सादर करावेत
गडचिरोली,दि.23 : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने सन 2024-25 या सत्रात विविध स्तरावर शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेचे आयोजन जिल्हा एकविध क्रीडा संघटनांच्या तांत्रिक सहकार्याने करावयाचे असल्याने तसेच या सत्रात नविन समाविष्ट खेळासह एकुण 93 क्रीडा प्रकाराचे आयोजन जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटनांच्या सहकार्याने करावयाचे आहे.
तरी शासनामार्फत ज्या खेळ प्रकारांना शालेय क्रीडा स्पर्धेत आयोजनास मान्यता देण्यात आलेली आहे असे खेळ व नव्याने समाविष्ट झालेले आष्टे-डू-आखाडा, युनिफाईट, कुडो, स्पीडबॉल, टेंग-सु-डो, फिल्ड आर्चरी, माँटेक्सबॉल क्रिकेट,मिनी गोल्फ, सुपरसेवन क्रिकेट, बेल्ट रेसलिंग, फ्लोअरबॉल, थायबॉक्सींग, हाफकिडो बॉक्सींग,रोप स्किपींग, सिलबम,वूडबॉल, टेनिस व्हॉलीबॉल, थांग त मार्शल आर्ट, कुरश, लगोरी, रस्सीखेच, पॉवरलिफ्टिंग, बीच व्हॉलीबॉल, टार्गेटबॉल, टेनिस क्रिकेट, जित कुन दो, फुटसाल, कॉर्फबॅल, टेबल सॉकर, हुप क्वॉन दो, युग मुन दो, वोवीनाम, ड्रॉप रो बॉल, ग्रॅपलिंग, पेंन्टाक्यू, लंगडी, जंपरोप, स्पोर्ट डान्स, चॉकबॉल, चॉयक्वांदो, फुटबॉल टेनिस, बुडो, म्युजिकल चेअर, टेनिस बॉल क्रिकेट या क्रीडा प्रकारांच्या स्पर्धेचे आयोजन, जिल्हा एकविध संघटनेने त्यांच्या तांत्रिक व आर्थिक सहकार्याने करावयाचे असल्याने उपरोक्त क्रीडा प्रकाराच्या सर्व संघटना पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या संघटनेला राज्यस्तरीय संघटनेची मान्यता असल्याबाबतचे दस्ताऐवज दि. 25जुलै 2024 रोजी दुपारी 01.00 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सादर करावे, जेणे करुन जिल्हा व विभागस्तरीय स्पर्धा आयोजन करणे सोईचे होईल असे जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी कळविले आहे.