जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत २५ शिक्षकांची उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदावर पदोन्नती

जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत २५ शिक्षकांची उच्च

श्रेणी मुख्याध्यापक पदावर पदोन्नती

              भंडारा,दि.23 : जुलै शिक्षण विभाग, जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने २५ शिक्षकांना उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात आली.प्राथमिक शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता प्रतीक्षा यादीतील शिक्षकांना समुपदेशन कार्यशाळेत मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात आली. सदर समुपदेशन प्रक्रिया समीर कुर्तकोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि प यांच्या अध्यक्षतेखाली सभा कक्षात शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, सर्व गटशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली. समुपदेशन कार्यशाळेनंतर लगेच पदोन्नत मुख्याध्यापकांचे नियुक्ती आदेश शिक्षण विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आले.

मुख्याध्यापक समुपदेशन कार्यशाळेसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, उपाध्यक्ष संदीप ताले तसेच शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती रमेश पारधी यांचे मार्गदर्शन लाभले. सदर समुपदेशन प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी श्रीमती वर्षा बेले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी (योजना) उपशिक्षणाधिकारी श्रीमती मंगला गोतारणे, विनायक वंजारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी गोमासे,कनिष्ठ प्रशासन अधिकारी गौतम बोरकर, बुरडे, वरिष्ठ सहाय्यक श्रीमती मंगला भोतमांगे,सुधाकर चोपकर, सुखदेवे, मोहरकर, मनोज धावडे, श्रीमती मोटघरे आदींनी परिश्रम घेतले.