यंत्रणा राबली  नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले  

यंत्रणा राबली  नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले  

             भंडारा,दि.22 :  जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे आज रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे प्रशासनाने शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. मात्र काल रात्री देखील जिल्हाप्रती व्यवस्थापन कक्ष होमगार्ड तसेच आपदा मित्रांचे द्वारे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. त्यामधील महत्त्वाचे म्हणजे-

आसगांव ता. पवनीः – दिनांक 21/07/2024 रोजी रात्रौ 09.00 वा दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पवनी तालुक्यातील आसगांव येथे पावसाचे पाणी जमा झालेले होते. सदर दरम्यान रस्त्यावर पाणी आल्याने तालुका प्रशासन यांना मदत पोहचविण्यास अडसर निर्माण झालेला होता. सदरचे अनुषंगाने तहसीलदार पवनी, ठाणेदार यांचे मार्गदर्शनात जिल्हा शोध व बचाव पथक व स्थानिक आपदा मित्र यांचे सहकार्याने नागरीकांना बोटच्या सहाय्याने सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले. सुरक्षीत स्थळी हलविण्यात आलेल्यांची जेवण व इतर व्यवस्था तालुका प्रशासन मार्फत करण्यात आलेली आहे.

ओपारा ता.लाखांदूरः- दिनांक 21/07/2024 रोजी रात्रौ 09.00 वा दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखांदूर तालुक्यातील ओपारा येथे पावसाचे पाणी जमा होऊन गांवाला वेढा निर्माण झाला. सदर दरम्यान चहु बाजुने पाणी आल्याने तालुका प्रशासन यांना मदत पोहचविण्यास अडसर निर्माण झालेला होता. सदरचे अनुषंगाने तहसीलदार लाखांदूर, ठाणेदार यांचे मार्गदर्शनात जिल्हा शोध व बचाव पथक व स्थानिक आपदा मित्र यांचे सहकार्याने नागरीकांना बोटच्या सहाय्याने सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले. सुरक्षीत स्थळी हलविण्यात आलेल्यांची जेवण व इतर व्यवस्था तालुका प्रशासन मार्फत करण्यात आलेली आहे.

ढोलसर ता.लाखांदूरः- दिनांक 21/07/2024 रोजी रात्रौ 09.00 वा दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखांदूर तालुक्यातील ढोलसर येथे गांवाला जोडणाऱ्या रस्त्यावर पावसाचे पाणी जमा होऊन गांवाला अंशतः वेढा निर्माण झाला. सदर दरम्यान चहु बाजुने पाणी आल्याने तालुका प्रशासन यांना मदत पोहचविण्यास अडसर निर्माण झालेला होता. परंतू सदरचे अनुषंगाने तहसीलदार लाखांदूर, ठाणेदार यांचे मार्गदर्शनात जिल्हा शोध व बचाव पथक व स्थानिक आपदा मित्र यांचे सहकार्याने नागरीकांना आवश्यक सुचना निर्गमित करण्यात आलेलया असुन तालुका प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.नागरीकांना आवाहन.

सद्यस्थितीत भंडारा जिल्हयाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

सर्व सखल भागात राहणाऱ्या नागरीकांनी कृपया तात्काळ सुरक्षीत स्थळी आश्रय घ्यावा.

पुराचे व अतिवृष्टीचे पाणी येण्याची वाट पाहू नये.

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.

प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.