22 ते 28 जुलै दरम्यान शिक्षण सप्ताह दिन”साजरा

22 ते 28 जुलै दरम्यान शिक्षण सप्ताह दिन”साजरा

            भंडारा,दि.22 : राष्ट्रीय शिक्षण धोरण 2023-2024 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त 22 ते 28 जुलै, 2024 या कालावधीत “शिक्षण सप्ताह” साजरा करणे बाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालया मार्फत कळविण्यात आले आहे. शिक्षण सप्ताहात आठवडयाचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून, यामध्ये शिक्षण विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे हा शिक्षण सप्ताह विदयार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्या मध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे.

        तसेच समीर कुर्तकोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,.रमेश पारधी, शिक्षण सभापती, जिल्हा परिषद, यांच्या मार्गदर्शना खाली आणि डॉ. रत्नप्रभा भालेराव, प्राचार्या, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, श्रीमती वर्षा बेले, शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद, रविंद्र सलामे शिक्षणाधिकारी (माध्य) जिल्हा परिषद भंडारा आणिश्री. रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद  यांचे समन्वयाने “शिक्षण सप्ताह” राबविण्यात येणार आहे.

           व सोमवार, 22 जुलै 2024 या दिवशी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस (TLM Day), मंगळवार, 23 जुलै 2024 या दिवशी मुलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस (FLN Day), बुधवार, 24 जुलै 2024 या दिवशी क्रिडा दिवस (Sports Day), गुरुवार, 25 जुलै 2024 या दिवशी सांस्कृतिक दिवस (Cultural Day), शुक्रवार,  26 जुलै 2024 या दिवशी कौशल्य दिवस (Sports Day), शनिवार, 27 जुलै 2024 या दिवशी मिशन लाईफच्या दृष्टी क्षेपातइको क्लब उपक्रम /शालेय पोषण दिवस (Eco Clubs for Mission LIFE/School Nutrition Day), रविवार, 28 जुलै 2024 या दिवशी समुदाय सहभाग दिवस (Community Involvement Day) हे सर्व दिवस शासनाने निर्देशित केलेल्या मार्ग दर्शक सूचना नुसार जिल्हयातील सर्व प्रकाराच्या, सर्व व्यवस्थापनाचा व सर्व माध्यमाच्या शाळा व अंगणवाडी, बालवाडी साठी पूर्ण करण्याबाबत भंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभागयांनी निर्देशित केले आहे. त्या नुसार जिल्हयातील सर्व शाळां मध्ये सर्व कार्यक्रमांची अंमलबजावणी करतांना शाळांचे सक्षमीकरण तसेच लोक समुदायाच्या माध्यमातून शालेय विकास, शाळा व समाज यांचे मध्ये उत्तम नाते संबंध आणि समाजाच्या घटकांमध्ये शाळां विषयीचे उत्तरा दायित्व निर्माण करणे ही मुख्य विचारधारा अंमलात आणणे हा शिक्षण सप्ताह साजरा करण्याचा उद्देश आहे. तसेच या सर्व उपक्रमांची माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी विकसित केलेल्या प्रणाली मध्ये वेळोवेळी अचुकपणे पोर्टलवर अपलोड करण्याबाबत जिल्हयातील सर्व शाळांना अवगत करण्यात आले आहे.

            याकरिता दिनांक 18 जुलै 2024 रोजी शिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद भंडारा शिक्षणाधिकारी (माध्य) जिल्हा परिषद आणि शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पत्र निर्गमित करण्यात आले आहे. “शिक्षणसप्ताह” अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी जिल्हयातील सर्व गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती यांची ऑनलाईन सभा  19 जुलै 2024 ला ठिक सकाळी 10.00 वाजता घेण्यात येवून यामध्ये प्राचार्या, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,  शिक्षणाधिकारी (प्राथ.) /शिक्षणाधिकारी (माध्य)/ शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या.