जिल्ह्यासाठी मुसळधार पाऊस, वादळीवारा मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट करीता अलर्ट

जिल्ह्यासाठी मुसळधार पाऊस, वादळीवारा मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट करीता अलर्ट

भंडारा दि. 20 : भारतीय हवामान खात्याने भंडारा जिल्ह्यामध्ये 20 जुलै ते 22 जुलै 2024 या कालावधी मध्ये मुसळधार पाऊस, वादळांबारा, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवलेलो आहे. दिनांक 20 जुलै 2024 या दिवसाकरिता Orange Alert दिलेला असून ऑरेंज अलर्ट कालावधीमध्ये काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे.

या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. बिज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी, पाऊस व विज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.

नागरीकांनी जल पर्यटन स्थळी अती उत्साही होवून जीव धोक्यात घालणारी कुठलीही कृती करू नये, शक्यतो पाण्यामध्ये उतरण्याचे धाडस करू नये. आपण कितीही चांगले जलतरणपट्टू असले तरी देखील अशा ठिकाणी पोहण्याचे टाळावे. नदी, नाले, दुघळी वाहत असतात तेव्हा पाणी पुलावरून किंवा रस्त्यावरून वाहत असते अशा वेळी चुकूनही तो पुल किंवा रस्ता चालत किंवा गाडी मधुन ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. आवश्यक खबरदारी घेवून स्वतःचो त्याच प्रमाणे आपल्या कुटूंबियांची व मित्र परिवाराची अशा ठिकाणी आवश्यक काळजी घ्यावी व प्रशासनाकडून निर्गमित होत असलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.

जिल्ह्यातील समस्त नागरिकांना व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावं व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे.