गडचिरोली पोलीस व माओवादी चकमकीत बारा जहाल माओवाद्यांना कंठस्नान

गडचिरोली पोलीस व माओवादी चकमकीत बारा जहाल माओवाद्यांना कंठस्नान

• आगामी नक्षल सप्ताहाच्या (२८ जुलै ते 3 ऑगस्ट) पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला

• तीन डीव्हीसीएम (Divisional Committee Member) दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह पाच एसीएम (Area Committee Member) व चार दलम सदस्य यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

• महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकूण ८६ लाखाचे बक्षिस

• घटनास्थळावरून ०७ अॅटोमॅटीक वेपन जप्त

• या चकमकिने संपूर्ण कोरची-टिपागड व चातगाव-कसनसूर दलममधील संपूर्ण सदस्यांचा झाला खात्मा

• संपूर्ण उत्तर गडचिरोली सशस्त्र माओवाद्यांपासून झाली मुक्त

काल दिनांक १७/०५/२०२४ रोजी सकाळी आगामी नक्षल सप्ताहाच्या (२८ जुलै ते ०३ ऑगस्ट) पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने कोरची टिपागड व चातगाव कसनसूर दलमचे काही १२ ते १५ माओवादी छत्तीसगड सिमेजवळील वांडोली गावाजवळील जंगल परिसरात तळ ठोकुन असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे सात पथक तातडीने सदर जंगल परिसरात माओवाद विरोधी अभियान राबविणेकामी रवाना करण्यात आले. सदर माओवादविरोधी अभियान राबवित असतांना जंगलात दबा धरून बसलेल्या माओवादयांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलीसांनी माओवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले असता, माओवाद्यांनी शरण न येता

पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वरंक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर ०७ पुरुष व ०५ महिला माओवादी मृत अवस्थेत आढळले असुन सदर मृतक माओवाद्यांची ओळख पटली असून ती खालीलप्रमाणे आहे.

वरील मृतक माओवाद्यांवर चकमक, जाळपोळ व खुन इ. वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. यासोबतच सदर घटनास्थळावरुन ११ अग्नीशस्त्रांसह ०३ नग एके ४७ रायफल, ०२ नग ईन्सास रायफल, ०१ नग कार्बाइन रायफल, ०१ नग एसएलआर रायफल इ. स्वयंचलीत हत्यार, स्फोटके, डेटोनेटर, बिजीएल व मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे. सदर चकमकीत गडचिरोली पोलीस दलाचे एक पोलीस उप-निरीक्षक श्री. सतीश पाटील व दोन पोलीस जवान पोहवा/५९३ शंकर पोटावी व पोअं/४०९७ विवेक शिंगोळे हे जखमी झाले आहेत. अभियानादरम्यान त्यांना हेलीकॉप्टरच्या मदतीने तातडीने बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारकामी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहे.

सदरचे माओवाद विरोधी अभियान विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, श्री. संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे यांच्या नेतृत्वात सी-६० कमांडोंनी यशस्वीपणे पार पाडले. सन २०२१ पासून गेल्या तीन वर्षात गडचिरोली पोलीसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ८० कट्टर माओवाद्यांना कंठस्नान, १०२ माओवाद्यांना अटक करण्यात आले आहे व २९ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. सी – ६० जवानांच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी कौतुक केले आहे. पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी सांगितले की, संपूर्ण कोरची-टिपागड आणि चातगाव-कसनसूर दलम या ऑपरेशनमध्ये पुसून टाकण्यात आले आहे, त्यामुळे उत्तर गडचिरोलीचा बहुतांश भाग माआंवाद्यांच्या प्रभावापासून मुक्त झालेला आहे. तसेच पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी सदर भागात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून सर्व माओवाद्यांना आत्मसमर्पण करुन आपले जीवनमान उंचाविण्याचे आवाहन केले आहे.