पिक विम्यासाठी अधिक शुल्क आकारल्यास तक्रार करा कृषी विभागाचे आवाहन
भंडारा, दि.18 : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2024-25 पिक विमा भरण्याची कार्यवाही सामुहिक सेवा केंद्र (CSC/VLE) केंद्रामार्फत केली जात आहे. यासाठी केंद्रशासनाने प्रति शेतकरी रूपये 40 शुल्क निर्धारित करून दिले असून ते संबंधित विमा कंपनी मार्फत सामुहिक सेवा केंद्र (CSC/VLE) यांना दिले जाते. म्हणजेच सर्व (CSC/VLE) धारकांनी पिक विमा अर्ज भरतांना शेतकरी यांचेकडून प्रति अर्ज केवळ 1 रूपये शुल्क आकारण्यात यावे. जर सामुहिक सेवा केंद्र (CSC/VLE) चालक जास्तीचे शुल्क आकारत असतील तर शेतकऱ्यांनी
टोल फ्रि क्र.- 14599/ 14447 किंवा
Email Id : support@csc.gov.in किंवा
व्हॉट्सअप क्र.- 9082698142 किंवा
फोन नं. – 011-49754923 011-49754924 यावर तक्रार नोंद करावी,असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, संगीता माने यांनी कळवले आहे.