पावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थिती साठी आरोग्य विभाग सज्ज

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थिती साठी आरोग्य विभाग सज्ज

गडचिरोली, जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मान्सून पूर्व नियोजन करण्यात आले आहे.यामध्ये जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या भामरागड सिरोंचा व अहेरी तालुक्यात रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होऊ नये तसेच पावसाळ्या दरम्यान भामरागड तालुक्याचा संपर्क तुटतो यासाठी जिल्ह्यातील इतर आरोग्य संस्थांमधून पुढील दोन महिन्याकरिता बालरोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ ,भुलरोगतज्ञ ,समुदाय आरोग्य अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांच्या सेवा आळीपाळीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यानुसार आतापर्यंत ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे एक बालरोग तज्ञ स्त्री रोग तज्ञ व भूलतज्ञ यांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सत डॉ प्रमोद खंडाते यांनी सांगितले , सोबतच सिरोंच्या अहेरी व भामरागड तालुक्यात प्रत्येकी पाच समुदाय आरोग्य अधिकारी सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
गडचिरोली जिल्हा हिवतापाकरता अति संवेदनशील असल्याने येथे मोठ्या प्रमाणात रक्तनमुने संकलन करण्यात येते त्याचा त्याचा अनुशेष दूर करण्याकरिता नागपूर विभागातील इतर जिल्ह्यातून 16 च्या बॅचमध्ये तीन बॅचेस द्वारे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत यापैकी आतापर्यंत भामरागड येथे जवळपास आठ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच गडचिरोली जिल्ह्यात हिवताप आजाराचे सर्वेक्षण करण्याकरिता मनुष्यबळ कमी पडू नये म्हणून 165 हंगामी क्षेत्र कर्मचारी अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत यापैकी जवळपास 22 यापैकी हंगामी क्षेत्र कर्मचारी भामरागड तालुक्यात देण्यात आलेले याचा अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ पंकज हेमके यांनी दिली.
तचेस रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्याकरिता आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली तर्फे 15 वा वित्त आयोग अंतर्गत मेडिकल मोबाईल युनिट अहेरी भामरागड येथे वैद्यकीय अधिकारी तसेच एटापल्ली भामरागड व गडचिरोली येथे आरोग्य सेवक यांची नियुक्ती करण्यात आले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी सांगितले.
सोबतच हिवतापासाठी अतिसंवेदनशील असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरी येथे एकूण दोन वैद्यकीय अधिकारी दोन माणसेवी वैद्यकीय अधिकारी व पाच समुदाय आरोग्य अधिकारी हे नियमितपणे सेवा देत आहेत. येथे मनुष्यबळाची कमतरता पडू नये म्हणून हिवताप सर्वेक्षणाकरिता अतिरिक्त नऊ हंगामी क्षेत्र कर्मचारी व दोन प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व दोन समुदाय आरोग्य अधिकारी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र तालुका तसेच जिल्हा स्तरावर साथरोग नियंत्रण कक्ष कार्यन्वीत करण्यात आले आहे.