आदिवासी उमेदवांराकरीता स्पर्धा पूर्व प्रशिक्षण 29 जुलैपर्यंत करा अर्ज

आदिवासी उमेदवांराकरीता स्पर्धा पूर्व प्रशिक्षण
29 जुलैपर्यंत करा अर्ज

आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहीती व मार्गदर्शन केंद्र, गडचिरोलीच्या वतीने जिल्यातील अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता MPSC पुर्व प्रशिक्षण, जिल्हा निवड समीतीच्या विविध पद भरती बाबत तसेच IBPS, SSC च्या परीक्षाबाबत स्पर्धा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण घेऊ इच्छीणा-या उमेदवांराकडे शालांत परीक्षा उतीर्ण प्रमाणपत्र व रोजगार नोदंणी कार्ड (EMPLOYMENT CARD )असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महीने आहे. प्रशिक्षणा दरम्यान रु.1000 ( एक हजार रुपये ) दरमहा विदयावेतन दिले जाईल. प्रशिक्षण पुर्ण करणा-या उमेदवांराना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येते. कार्यालयात अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. अर्ज दि. 29 जुलै 2024 पर्यत या कार्यालयात सादर करावेत तदनंतर मुलाखत दि.30 जुलै 2024 रोजी आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहीती व मार्गदर्शन केद्र, शासकीय संकुल बॅरेक क्र.2 गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे त्याकरीता उपस्थ‍ित राहावे अधिक माहीतीसाठी 8485814488 या क्रमाकांवर संपर्क साधावा असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.