डॉ. पंजाबराव देशमुख – सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती / सारथी मार्फत मराठा, कुणबी, या लक्षित गटातील विद्यार्थ्यांकारिता सुवर्ण संधी

डॉ. पंजाबराव देशमुख – सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती

सारथी मार्फत मराठा, कुणबी, या लक्षित गटातील विद्यार्थ्यांकारिता सुवर्ण संधी

  मराठा, कृष्णबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्यांकारिता डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती या उपक्रमांतर्ग पात्र विद्याध्यर्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. शासन निर्णय ईपीसी-२०१७/प्र.क्र.४०२/शिक्षण-१ दि.०८/११/२०१७ व शासन शुद्धिपत्रक क्र. ईबीसी- २०१७/प्र.क्र. ४०२/शिक्षण-१ दि.११/०३/२०१८ परिशिष्ट व नमूद शैक्षणिक संस्थामध्ये पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी प्रवेशित करण्याचा निर्णय सारथी संस्थेने घेतलेला आहे.

           हि योजना शैक्षणिक वर्ष २०२२ – २०२३ पासून लागू करण्यात आली आहे. त्यानुसार देशातील नामांकित २०० शैक्षणिक संस्थामध्ये वर्ष २०२४- २०२५ प्रवेशा करिता मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे. विस्तृत माहिती सारची संस्थेच्या https://sarthi- maharashtragov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलो आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 जुलै,2024 पर्यत आहे.

           तरी जास्तीत जास्त लक्षित गटातील विद्यार्थ्यांनो या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन नागपूर येथील सारथीच्या विभागीय कार्यालयातील उपव्यवस्थापकीय संचालक, तथा उपविभागीय अधिकारी श्री. सुरेश बगळे यांनी केलेले आहे.