विद्या निकेतन विद्यालयात कायदेविषयक शिबीर

विद्या निकेतन विद्यालयात कायदेविषयक शिबीर

चंद्रपूर, दि. 15 : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,  मुंबई यांच्या निर्देशानुसार किमान समान कार्यक्रमअंतर्गत जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, लायन्स क्लब व युगल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्या निकेतन विद्यालया येथे  कायदेविषयक शिबीराचे आयोजन  करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री गोहकर, लायन्स क्लब युगलचे अध्यक्ष रितेश सागलानी तसेच संस्थेचे विश्वस्त आणि विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत वेळेावेळी वेगवेगळया शाळा व महाविद्यालयामध्ये कायदेविषयक जनजागृती  व्हावी, म्हणून शिबीर आयोजित केले जातात. मुलांना त्यांच्या संदर्भातील  कायदे, हक्क, अधिकार व कर्तव्ये माहित असणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते 3 रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा बाल न्याय मंडळाचे प्रमुख  न्ययाधीश एस.ए. लाडसे, यांनी बाल गुन्हेगारी संदर्भांत असलेला कायदा  बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, 2015 बाबत सर्व मुलांना उदाहरणासह माहिती दिली. कार्यक्रमाचे दुसरे वक्ते 6 वे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एन.आर. गोरले, यांनी मुलांचे अधिकार, शिक्षणाचा अधिकार तसेच बेटी बचाव बेटी पढाव या विषयांवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाखा कर्वे यांनी तर आभार मुख्याध्यापिका राजश्री गोहकर यांनी मानले.