गोंड- गोवारी अभ्यास समिती विदर्भ दौऱ्यावर / सामाजिक संघटनांकडून स्विकारणार निवेदने

गोंड- गोवारी अभ्यास समिती विदर्भ दौऱ्यावर
सामाजिक संघटनांकडून स्विकारणार निवेदने
गडचिरोली,दि.15 : गोंड गोवारी समाजाच्या निवेदनावर अभ्यास करण्यासाठी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्या. के. एल. वडणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष न्या. वडणे हे विदर्भ दौऱ्यावर असून ते दिनांक 15 व 16 जुलै 2024 रोजी रविभवन, शासकीय विश्रामगृह, नागपुर येथे उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते नागपूर विभागातील गोंड गोवारी समाजाच्या संघटनाचे निवेदन स्विकारणार आहेत.
गोंड-गोवारी समाजाच्या संघटना तसेच त्यांचे प्रतिनिधी यांना लेखी निवेदने सादर करावयाची असल्यास त्यांनी 15 व 16 जुलै रोजी रविभवन, नागपूर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सादर करावी. याप्रसंगी समितीपुढे संघटनेतील प्रतिनिधीला आपले म्हणने थोडक्यात मांडण्यासाठी संधी दिली जाईल, असे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती गडचिरोलीचे सहआयुक्त जितेंद्र चौधरी यांनी कळविले आहे.