अतिसार रोखण्यासाठी स्वछतेचे सर्व नियम पाळा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री समीर कुर्तकोटी यांचे आवाहन

अतिसार रोखण्यासाठी स्वछतेचे सर्व नियम पाळा

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री समीर कुर्तकोटी यांचे आवाहन

            भंडारा,दि.15 : – ग्रामीण भागात वैयक्तिक आणि सावर्जनिक परिसर स्वछता जर पाळली गेले तर अतिसाराला दूर ठेवता येते असे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी सांगितले. अतिसार थांबवा मोहिमेच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात जिल्हा स्तरीय सुकाणू समितीची सभा आयोजित करण्यात आली होती.

           हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग,पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,महिला बालकल्याण विभाग,शिक्षण विभाग,ग्रामपंचायत विभाग आदींच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. हे अभियान एकूण आठ आठवडे चालणार असून प्रत्येक आठवड्यात वेगवेगळे उपक्रम गावपातळीवर घेण्यात येणार आहे.

अतिसार सारख्या घातक आजार होऊ नये म्हणून ग्रामीण भागात जनतेने शुद्ध पाणी पुरवठा होत नसेल किंवा शुद्ध पाणी पिण्यास उपलब्ध होत नसेल तर उपलब्ध असलेले पाणी ५ मिनिटे उकळून घेऊन थंड

          झाल्यावर स्वच्छ कपड्याने गाळून घेतल्यावर पिण्यास वापरावे तसेच २०लिटर पाण्यामध्ये जीवनड्रॉपची २ ते ३ थेंब टाकून अर्ध्या तासाने पाणी पिण्यास उपयोगात आणावे. याबाबत गृहभेटी दरम्यान जनजागृती करून माहिती देण्यात यावी. गावपातळीवर ग्रामस्थानी वैयक्तिक  व परिसर स्वछ्तेची काळजी घ्यावी. जसेही अतिसाराची लक्षणे दिसल्यास ग्रामीण भागात प्राथमिक उपचार म्हणून १ लिटर पाण्यात ८ छोटे चमचे साखर व चिमूटभर मीठ टाकून ते द्रावण पिण्यास द्यावे आणि लगेच जवळील प्रा.आ.केंद्रात उपचारासाठी जावे असे डॉ मिलिंद सोमकुंवर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.

             सदरील जिल्हास्तरीय सुकाणू समिती सभेला डॉ दीपचंद सोयाम जिल्हा शल्य चिकित्सक,डॉ मनीषा साकोडे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, डॉ धीरज लांबट ग्रा.रु पवनी,डॉ शिल्पा राठोड वै.अ,डॉ चंद्रशेखर निबर्ते स्थानिक निमा अधिकारी,डॉ अशोक ब्राह्मणकर बालरोग तज्ञ, श्री गणेश तईकर मॅनेजर जिल्हा अग्रणी बँक,राजू खवस्कर,हेमंत चांदवस्कर रेड क्रोस सोसायटी,श्री बनकर जि.वि.मा.अ व सर्व तालुका आरोग्य अधिकारी हे उपस्थित होते.