विकास परवानगी मिळेल ऑनलाईन

विकास परवानगी मिळेल ऑनलाईन

दि. 01/01/2024 पासून सर्व विकास परवानगी ऑनलाईन पद्धतीने देण्याचे निर्देश आहेत. त्याकरीता शासनाद्वारे BUILDING PERMISSION MANAGEMENT SYSTEM (BPMS) / AUTO DCR हे पोर्टल विकसीत करण्यात आले आहे. त्यान्वये संपूर्ण भंडारा जिल्हयात यापुढे विकास परवाणगी जसे बांधकाम परवानगी, अभिन्यास परवानगी, भुखंड एकत्रिकरण/ विभाजन इत्यादी ऑनलाईन पद्धतीने BPMS / AUTO DCR पोर्टलद्वारे देण्यात येत आहेत.

ही प्रणाली भंडारा जिल्हात कार्यान्वीत झालेली असून यापुढे जमीन विकास परवानगी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच नोंदनिकृत अभियंत्याच्या मार्फत स्विकारण्यात येत आहेत व सर्व परवानगी या ऑनलाईन पद्धतीनेच देण्यात येत आहेत. नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने विकास परवानगी घेण्यास अडचणी उद्भवल्यास त्याबाबतचे मार्गदर्शन संबंधीत कार्यालय तसेच नोंदनीकृत अभियंता यांचेमार्फत देण्यात येईल. असे नगररचना विभागाद्वारे कळविण्यात आले आहे.