मोहाडी तालुकयातील अंगणवाडी केंद्राना जिल्हाधिकाऱ्यांची भेट
भंडारा, दि. 10 जुलै :- “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या अर्ज विक्री व अर्ज स्वीकृती प्रक्रीयोचा क्षेत्रीय पातळीवर पाहणीच्या दृष्टीने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज मोहाडी तालुकयातील अंगणवाडी केंद्र व तहसील कार्यालय मोहाडी, व नगरपरिषद क्षेत्रातील अंगणवाडी तसेच मोहगाव देवी ,गट ग्रामपंचायत एकलारा -दहेगाव येथील अंगणवाडी व नागरी सुविधा केंद्रात भेट देवून पाहणी केली.यावेळी तहसीलदार सुरेश वाकचौरे,सहआयुक्त नगरपालीका प्रशासन सिध्दार्थ मेश्राम, उपस्थित होते.
यावेळी मोहाडी नगरपंचायत क्षेत्रात प्रभागात 13 अंगणवाडया असून त्यावर अर्ज विक्री तसेच ऑनलाईन व ऑफलाईन विक्री सुरू असल्याची माहिती श्री.मेश्राम यांनी दिली.
तहसील कार्यालयात वयाचे दाखले व योजनेसंबंधी कागदपत्रासाठी नागरिकांची गर्दी होती.काही नागरिकांनी जिल्हाधिका-यांना अडचणी सांगितल्या.त्याही त्यांनी ऐकून त्याचे निरसन करण्याचे आदेश यंत्रणेला दिले.
लाडकी बहीण योजनेच्या अर्जामध्ये भरावयाच्या बाबीसंबंधी अंगणवाडी सेविका,तसेच सेतु केंद्रावरील कर्मचा-यांना जिल्हाधिका-यांनी निर्देश दिले. महीलांना या योजनेचा अर्ज भरतांना येणा-या अडचणीचे समाधान करून अर्ज शासन सूचनेनुसार भरून् घ्यावे,असे श्री.कुंभेजकर यांनी सांगितले.