मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरु
ज्येष्ठ नागरिकांनी सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा
भंडारा, दि.10 : राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणा-या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाय योजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/ उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादी. मानसिक स्वास्थ अबाधित ठेवणेकरिता सदर योजने अंतर्गत पात्र वृध्द लाभार्थ्यांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपेंड, स्टिल व्हील चेअर फोल्डींग वॉकर, फोल्डींग वॉकर कमोड खुची, नि-ग्रेस लंबर बेल्ट सर्वाइकल कॉलर ही साधने / उपकरणे खरेदी करता येतील.
करीता सन 2024-25 या कालावधीतील मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरीता ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु आहे. तरी मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांचे खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करावे.
Ø आधार कार्ड / मतदान कार्ड
Ø राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेराक्स (आधार संलग्न)
Ø पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
Ø स्वयं घोषणापत्र
Ø शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे
Ø उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न, 2 लाखापर्यंत) इ. कागदपत्रासह परिपुर्ण अर्ज सहाय्यक
आयुक्त समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब सामाजिक न्याय भवन, सिव्हिल लाईन, जि. प. चौक, भंडारा या कार्यालयात सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त बाबा साहेब देशमुख समाज कल्याण विभाग भंडारा यांनी कळविले आहे.