शासकीय वसतीगृह प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

शासकीय वसतीगृह प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सर्व इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मागासवर्गीय मुला/मुलींचे शासकीय वसतीगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सोई सुविधा मोफत पुरविण्यात येतात. तेव्हा सन 2024-25 करीता ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे. अशा विद्यार्थ्यांने दि. 21 जुलै 2024 पर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक वसतिगृहामध्ये उच्च शिक्षण अभ्यासक्रम प्रवेशाकरीता प्रवेश अर्ज सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, गडचिरोली येथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे.
शासकीय वसतीगृहाचे सन 2024-25 साठीचे प्रवेशाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी.
ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी, दिनांक 21 जुलै 2024 पर्यंत. पहिली निवड यादी गुणवत्तेनुसार अंतिम करणे व प्रसिद्ध करणेचा दि. 30 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध करणे. दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी पहिली निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत, दि. 16 ऑगस्ट 2024 रोजी रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे. दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.
संबधित जिल्हा स्तरावरील वसतीगृहात प्रवेशाबाबत ईच्छुक विद्यार्थ्यांने अर्ज भरुन सदर अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण, गडचिरोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन गडचिरोली येथे संबंधित कर्मचारी यांचेकडे सादर करण्यात यावे. असे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, गडचिरोली डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.