पारंपरिक वस्त्रोद्योग विणकरांसाठी बक्षीस योजना 19 जुलै पर्यंत अर्ज करता येणार

पारंपरिक वस्त्रोद्योग विणकरांसाठी बक्षीस योजना

19 जुलै पर्यंत अर्ज करता येणार

        भंडारा दि.09 :  हातमाग वस्त्रोद्योग विणकरांना अतिरिक्त प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्यातील पाच पारंपरिक क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट डिझाईनसाठी स्पर्धा घेण्यात येणार असून 19 जुलै 2024 पर्यंत प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग कार्यालयात अर्ज करता येणार आहे.

           वर्ष 2024-25 करिता  हातमाग विणकर कुटूंबाना प्रतिमाह 200 युनिट पर्यंत मोफत वीज, उत्सव भत्ता योजना, पाच  पारंपरिक क्षेत्रांमधील वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना व इतर हातमाग योजनांचा लाभ घेण्याकरिता  अर्ज करण्याचे आवाहन, वस्त्रोद्योग विभागाच्या नागपूर प्रादेशिक उपायुक्त सीमा पांडे यांनी केले आहे.

      राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 जाहीर केले आहे. हातमाग वस्त्राद्योग विणकरांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी अतिरिक्त प्रोत्साहन देणे हे या धोरणाचे एक उद्दिष्ट आहे. याच उद्दिष्टा अंतर्गत पैठणी साडी, हिमरु शाल ,करवत काटी, घोंगडी व खण फॅब्रीक या पाच पारंपरिक क्षेत्रातील विणकरांकरिता राज्यस्तरावर स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षीस 20,000/-, द्वितीय बक्षीस 15,000/-, तृतीय बक्षीस 10,000/- प्रदान करण्यात येणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्याकरिता नागपूर विभागातील हातमाग वस्त्रोद्योग विणकरांनी आपले डिझाईन प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग ,नवीन प्रशासकीय इमारत क्र 2,बी-विंग ,8वा मजला ,सिव्हील लाईन ,नागपूर-440001 या कार्यालयात  सादर करता येणार आहे.