महामंडळाच्या नाविण्यपूर्ण योजनांचा प्रचार व प्रसार 12 पोट जातीतील  महिला व पुरुष या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन.

महामंडळाच्या नाविण्यपूर्ण योजनांचा प्रचार व प्रसार 12 पोट जातीतील

 महिला व पुरुष या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन.

               भंडारा : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मंडारा मार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील कुटुंबाची सामाजीक, आर्थीक उन्नती व्हावी त्यांना रोजगार व स्वरोजगाराची साधणे उपलब्ध व्हावीत या उद्देशाने तसेच सर्वसामान्यांचा विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महामंळाने नाविण्यपूर्ण योजना सुरू केल्या आहेत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ मातंग समाजातील तळागळापर्यंत व शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचण्याकरीता नाविण्यपूर्ण योजना एनएसफडीसी योजना अंतर्गत सुरू झालेल्या आहे. सुविधा कर्ज योजना (प्रकल्प मर्यादा ५,००,०००/-). (उद्दिष्ट २५ लाभार्थी) महिला समृध्दी योजना (प्रकल्प मर्यादा १,४०,०००/-) (उद्दिष्ट २० लाभार्थी) शैक्षणिक कर्ज योजना (देशाअंतर्गत शिक्षणासाठी ३० लाख व परदेशाअंतर्गत शिक्षणासाठी ४० लाख) अनुदान योजना (प्रकल्प मर्यादा ५०,०००/-) बीजभांडवल योजना (प्रकल्प मर्यादा ७,००,०००/-) सदर योजने अंतर्गत प्राप्त होणारे कर्ज प्रस्ताव प्रत्यक्ष कार्यालयात येऊन सादर करावा.

          त्या करिता सर्व लाभार्थीना सादर केल्या नंतर त्याच्या तीन प्रती मुळ कागदपत्रासह कार्यालयास सादर कराव्यात. या योजनेस लागणारे कागदपत्रे पुढील प्रमाणे असतील. अर्जदाराचा जातीचा दाखला (सहाम अधिकारी यांच्याकडुन घेतलेला असावा.) अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, (उत्पन्न मर्यादा ३.०० लाखापर्यंत, तहसीलदार यांच्याकडुन घेतलेला असावा.)

             नुकताच काढलेला पासपोर्ट साईझ फोटोच्या दोन प्रत्ती जोडाव्यात. राशनकार्डच्या झेराक्स प्रती.  आधारकार्ड, मतदान कार्डची झेरॉक्स प्रत तसेच मोबाईल नंबर आधार लिंक असलेला. अर्जदाराचा शेक्षणिक दाखला व शाळा सोडल्याचा दाखला (टी सी.) व इत्यादी आवश्यक कागदपत्रे यांची आवश्यकता असणार आहे करीता अनुसुचित जातीतील मांग, मातंग, मांग गारुडी, मांग गारोडी, व इतर पोट जातीतील अठरा वर्षावरील महिला व पुरुष यांनी या योजनेचा लाम घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक  सी. जी. उके यांनी केले आहे.

          या करिता कार्यालयीन खालील पत्त्यावर संपर्क साधावा. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जिल्हा परिषद चौक भंडारा. मोबाईल नं. 8830916076/9403416795 जिल्हा व्यवस्थापक यवस्थापक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) भडारा