पिक विमा योजना चित्ररथाचे उद्घाटन संपन्न  

पिक विमा योजना चित्ररथाचे उद्घाटन संपन्न  

   भंडारा : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2024-25 राबविण्यासाठी शासनाकडुन मंजुरी प्राप्त झालेली आहे. भंडारा जिल्हयात ही योजना राबविण्याकरिता चोला मंडलम जनरल इंन्शुरंस लि. ही कंपनी नियुक्त असुन ‍ या योजने अंतर्गत धान  सोयाबिन ही दोन अधिसुचित पिके आहेत. नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी अधिसुचित विमा क्षेत्र घटक ग्राहय धरण्यात येईलयावर्षी पासून सर्व समावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ 1 रूपया भरून पिक विमा पोर्टल वर नोंदणी करावयाची आहे.

              सदर योजना कर्जदार व बिगरकर्जदार शेतक-यांसाठी एैच्छिक आहे. सदर योजनेत बँक/ कृषि पतपुरवठा सहकारी संस्था/ प्रादेशिक ग्रामीण बँक/ आपले सरकार सेवा केंद्र किंवा विमा कंपनीचे अधिकृत विमा प्रतिनिधी यांचे मार्फत विमा हप्ता भरावयाचा आहे.

              प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत नियुक्त असलेली चोला मंडलम जनरल इंन्शुरंस लि. कंपनी मार्फत 1 रुपयामध्ये जिल्हयातील जास्तीत जास्त शेतक-यांनी  पिक विमा  काढण्याच्या अनुषंगाने प्रचार प्रसिद्धी करिता दिनांक 8 जुलै 2024 ला निवासी उपजिल्हाधिकारी, श्रीमती स्मिता बेलपात्रे व जिल्हा अधिक्षक  कृषि अधिकारी, यांच्या हस्ते चित्ररथाचे फित कापुन उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन दरम्यान चोला मंडलम जनरल इंन्शुरंस कंपनी चे राज्य प्रमुख संजयकुमार शर्मा व जिल्हा प्रमुख  सुशिलकुमार विश्‍वकर्मा, विठ्ठल खुळे जिल्हा समन्वयक, सौरभ चंद्रीकापुरे जिल्हा समन्वयक व चोला मंडलम जनरल इंन्शुरंस कंपनी चे तालुका समन्वयक तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा कार्यालयातील शरद रामटेके उपस्थित होते.

                जिल्हयात गावागावात फिरुन 1 रूपया भरून पिक विमा काढण्याबाबतचे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करण्याकरिता चोलामंडलम जनरल इंन्शुरंस कंपनीचे चित्ररथ फिरविण्यात येत आहे.