मान्सून पूर्व आढावा सभा संपन्न

मान्सून पूर्व आढावा सभा संपन्न

             भंडारा – आरोग्य,शिक्षण,महिला बालकल्याण व पंच्यात विभाग यांची संयुक्त सभा मोहाडी येथील परमात्मा एक सभागृह येथे पार पडली.सदर आढावा सभेत सर्व विभागाच्या कर्मचारी याना मान्सूनपूर्व काळातील करावयाच्या उपाययोजना बाबत सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले.आपल्या हलगर्जीपणा मुळे वाईट घटना गडू नये याबाबत सर्वानी दक्ष राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. रमेश पारधी आरोग्य व शिक्षण सभापती यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले कि,चारही विभाग एकत्र येऊन गावाचा विकास कसा करता येईल याचे नियोजन व आलेल्या योजना प्रभावीपणे राबवून समाजातील शेवटच्या घटक पर्यंत लाभ पोचवणे हे काम करण्यासाठी सदरील आढावा सभा आहे.जे काम आम्ही जिल्हा स्तरावर बसून नाही करू शकत ते काम गाव पातळीवर राहून कर्मचारी करू शकतात. गावात परिवर्तन घडवून आणू शकणारा घटक म्हणजे कर्मचारी होय त्यासाठी सर्वानी एकदिलाने काम करणे गरजेचे आहे असे सांगितले.

          सदरील कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ.मिलिंद सोमकुंवर जिल्हा आरोग्य अधिकारी,श्री रवींद्र सोनटक्के शिक्षणाधिकारी (प्राथमिक), रवींद्र सलामे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद भंडारा यांनी मार्गदर्शन केले.

          या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती रितेश वासनिक सभापती पंचायत समिती मोहाडी, श्रीमती.छायाताई डेकाटे नगराध्यक्ष नगर परिषद मोहाडी, बाळूभाऊ मलेवार उपसभापती पंचायत समिती मोहाडी, आनंदराव मलेवार, नरेशभाऊ ईश्वरकर,उमेशजी पाटील,महादेवजी पचघरे सर्व जि.प.सदस्य जिल्हा परिषद भंडारा, श्रीमती.अनिताताई नलगोकुळवार,श्रीमती.दुर्गाताई बुराडे,श्रीमती.प्रीतीताई शेन्डे सर्व सदस्य पंच्यात समिती मोहाडी यांची होती.तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.चिराग सोनकुसरे तालुका आरोग्य अधिकारी तर संचालन मुकुंद ठक्कर यांनी केले आणि आभार डॉ सुनीता निंबार्ते यांनी मानले.कार्यक्रमाला सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, मुख्यध्यापक,शिक्षक,ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, मोठ्या संख्यने उपस्थित होते.