शाळा बाह्य मुलांचे सर्वेक्षणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक.

शाळा बाह्य मुलांचे सर्वेक्षणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक.

 भंडारा : शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित  वय वर्ष 3 ते 18 वयोगटातील बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी भंडारा योंगेश कुभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. घरोघरी भेटी देवून बस स्थानक, रेल्वे स्थानक, फुटपाथ, सिग्नल, हॉटेल ,खानावळी, सार्वजनिक ठिकाणी, बाजारतळ वीटभट्टी दगडखाणी, साखर कारखाने तसेच बालमजूर असण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी शाळा बाहय मुलांचे सर्वेक्षण जिल्हा, तालुका, केंद्र, आणि गाव पातळीवर राबवण्यात येणार आहे.

या संर्वेक्षणात  महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय, विषय सहाय्य विभाग, महिला व बालविकास, कामगार आयुक्तालय, आदिवासी विभाग, अल्पसंख्यांक विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य, गृह विभाग, व शिक्षण विभागाच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे. शाळाबाहय मुलाचे सर्वेक्षण हे प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षक, तसेच अंगणवाडी/सेविका मदतीस,स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केले जाणार आहे.

याबाबत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी सर्वेक्षणाच्या प्रभावी  अंमलबंजावणीकरिता सुचना दिल्या. सदर सभेस जिल्हाधिकारी  व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व विभागांना शाळा बाहय विदयार्थी  सर्वेक्षणात सहभाग घेऊन एकही विदयार्थी शाळाबाह्य व शिक्षणापासून वंचित राहणार नाही. याची दक्षता घेण्याबाबत सूचना केल्या.

जिल्ह्यातील शाळेत न जाणारी अनियमित असणारी आणि बाहेरून आलेली अशी मुले शोधून त्यांना शाळेत दाखल केले जाणार आहे.  यासाठीचे  सर्वेक्षण 05 ते 20 जुलै 2024 दरम्यान राबविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती संयुक्तरित्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भंडारा प्राचार्य डॉ. रत्नप्रभा भालेराव व शिक्षणाधिकारी  (प्राथमिक )  रवींद्र सेानटक्के यांनी  दिली.

   यावेळी सभेस जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा, यांच्या समवेत शिक्षणाधिकारी (माध्यमिक), रविंद्र सलामे, जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे प्रतिनिधी, एस.एस.बंडीवार, महिला व बालविकास अधिकारी तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी  श्रीमती मनिषा कुरसुगे, आदिवासी  विकास प्रकल्प अधिकारी मोरे , उपशिक्षणाधिकारी  (प्राथ.) श्रीमती मंगला गोतारणे , कामगार उपआयुक्त कार्यालय भंडारा यांचे प्रतिनिधी बारई, तसेच सर्व गटशिक्षणाधिकारी ,स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी जी.एन.टिचकुले, शिक्षण विस्तार अधिकारी शिक्षण विभाग (प्राथमिक), डमदेव कहालकर, माडेमवार, समग्र शिक्षा जिल्हा परिषद भंडारा मधील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विरेंद्र एस. गौतम , समावेशित शिक्षण जिल्हा समन्वयक विलास गोंदोळे, मुकेश बन्सोड प्रोग्रमर अधिकारी प्रकाश काळे. वरिष्ठ  सहाय्यक मनोज धावडे, अरुण झुरमुरे साधन व्यक्ती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भंडारा उपस्थित होते.