बँक पुरस्कृत व महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

बँक पुरस्कृत व महामंडळामार्फत राबविण्यात

येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर : संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळमार्फत चर्मकार समाजातील वय वर्ष 18 ते 50 असलेल्या व  तीन लाख उत्पन्न मर्यादेतील लोकांना स्वंयरोजगारासाठी सन 2024-25 या चालू वर्षात बॅकेमार्फत कर्ज व अनुदान योजना (50 हजार रुपये), बिज भांडवल योजना (50001 ते 5 लाखांपर्यंत) त्याच प्रमाणे  महामंडळ पुरस्कृत  महिला अधिकारीता (5 लाख रुपये) मुदती कर्ज योजना (2 लाख व 5 लाख) लघुऋण योजना (50 हजार व 1.40 हजार रुपये) महिला समृध्दी योजना (50 हजार 1.40 हजार) शैक्षणिक योजना (देशात शिक्षणासाठी 10 लाख व परदेशात शिक्षणासाठी 20 लाख) या योजनाचे उद्ष्टि प्राप्त झाले आहे.

या योजनांमध्ये 10 हजार रुपये अनुदान  हे आता 50 हजार रुपयां पर्यंत योजनानिहाय देण्यात येत आहे. त्यादृष्टीने लवकरात लवकर कार्यालयात परीपुर्ण प्रस्ताव सादर करण्यात यावे. तसेच सदर सर्व योजनांचा जास्तीत जास्त चर्मकार समाजातील लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक कल्पना भंगाळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ  मर्या, सामाजिक न्याय भवन, रयतवारी रोड,  शासकीय दुध डेअरी जवळ, चंद्रपूर येथिल कार्यालयाशी संपर्क साधावा.