रास्त भाव दुकान परवानाकरीता 4 ऑगस्टपर्यंत अर्ज आमंत्रित
चंद्रपूर : चंद्रपूर, बल्लारपुर, राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी, चिमुर, वरोरा, व भद्रावती ही तालुके व चंद्रपूर (शहर)अंतर्गत गावे/ वार्डाकरिता एकूण 107 नवीन रास्त भाव दुकानाच्या परवाकरीता 4 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
जाहीरनामा प्रसिध्द झालेल्या गावातील/ क्षेत्रातील इच्छुक पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था) /नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट/ नोंदणीकृत सहकारी संस्था/महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था/महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था यांच्याकडून विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित तहसिलदार/ अन्नधान्य वितरण अधिकारी यांचे कार्यालयात 5 जुलै ते 4 ऑगस्ट 2024 या कालावधीत शासकीय कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून ) उपलब्ध होतील.
नवीन रास्त भाव /स्वस्त धान्य दुकानाकरिता आवेदन अर्ज शुल्क पाच रुपये राहील. परिपूर्ण भरलेले अर्ज 4 ऑगस्ट पर्यंत शासकीय कामकाजाचे दिवशी संबंधित तहसिलदार/ अन्नधान्य वितरण अधिकारी यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) स्वीकृत केले जातील. जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आलेल्या गावाचे/ वार्डांची नाव, तालुक्यांतील जाहीरनाम्यांची संख्या, अर्ज करण्याच्या अटी व शर्ती इत्यादि सर्व माहिती संबंधित तहसिलदार, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग चंद्रपूर, जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूर, प्रकल्प संचालक, ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर, संबंधित नगरपालिका/ महानगरपालिका/ ग्रामपंचायतीचे नोटिस बोर्डवर तसेच www.chanda.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडे यांनी कळविले आहे.