कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान

योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

भंडारा : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहीन कुटूंबाना शेतजमिन उपलब्ध करुन दिली जाते. नागपूर जिल्हात शेती असणाऱ्या इच्छूक शेतकऱ्यांनी समाज कल्याण विभागास शेती विकण्याकरीता सहायक आयुक्त समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, सिव्हील लाईन्स,भंडारा या कार्यालयास विहीत नमुन्यात प्रस्ताव सादर करावेत.  अधिक माहीतीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण भंडारा येथे संपर्क साधावा.

जमीन विक्रीच्या अटी शर्ती

१. अर्जदाराने (जमिन विक्री करणारा/जमीन मालक) विहीत नमुन्यात अर्ज कार्यालयात सादर करावा.

२. जिरायती जमिनीकरीता ही रक्कम प्रती एकर ५ लाख आणि बागायती जमिनीकरीता ही रक्कम प्रति एकर ८ लाख रुपये इतक्या कमाल मर्यादेत राहील.